शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

मुर्तीजापूरात ट्रकचालक युवकाची दगडाने ठेचून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 10:10 AM

शेख वसीम शेख कलीम असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देशेख वसीम शेख कलीम (२६) हा ट्रक चालक म्हणून काम करीत होता.मोहम्मदीया प्लॉटला लागून असलेल्या शेत शिवारात त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.खूनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

मूर्तिजापूर : येथील देवरण रोड मोहम्मदीया प्लॉट परीसरातील शेत शिवारात ट्रक चालक असलेल्या २६ वर्षीय युवकाचा ४ मे च्या मध्यरात्री दुपट्ट्याने गळा आवळून तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मंगळवार, ५ मे रोजी उघडकीस आली. शेख वसीम शेख कलीम असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.खडकपूरा भागात राहणारा शेख वसीम शेख कलीम (२६) हा ट्रक चालक म्हणून काम करीत होता. घटनेच्या दिवशी सोमवारी संध्याकाळी तो ट्रक घेऊन घरी पोहोचला. रात्री आठ वाजता जेवण करुन घराबाहेर पडला. रात्रभर घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली. दरम्यान, मंगळवारी सकाळी देवरण रोडवरील मोहम्मदीया प्लॉटला लागून असलेल्या शेत शिवारात त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. गळ्याला दुपट्टा आवळलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह दिसून आल्याने त्याचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असला तरी चेहरा दगडाने ठेचून छिन्नविछिन्न केलेला आहे. खूनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, शहर ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, दिपक इंगळे घटनास्थळी पोहचले असून, पुढील तपास सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरMurderखूनCrime Newsगुन्हेगारी