शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त रस्त्याची पूजा करून वाहिली श्रद्धांजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST

अकोटः अकोट तालुक्यातील अकोट-हिवरखेड रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच आहे. त्यामुळे या अपघातग्रस्त रस्त्याची पूजा करून अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीला ...

अकोटः अकोट तालुक्यातील अकोट-हिवरखेड रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच आहे. त्यामुळे या अपघातग्रस्त रस्त्याची पूजा करून अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीला १७ जानेवारी रोजी जळगाव नहाटे येथील ग्रामस्थांनी श्रध्दांजली वाहिली.

अकोट-हिवरखेड रस्त्यावर जानेवारी महिन्यांत वाहनांच्या अपघातात तिघांचा मृत्यू, तर ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. तसेच अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून, अशा स्थितीत हिवरखेड रस्त्यावर सूतगिरणीनजीक जळगाव नहाटे येथील विनोद देवीदास ब्राम्हणे या युवकाचा मृत्यू झाला. मृत युवकाचा फोटो घेऊन या ठिकाणी जळगाव नहाटे येथील ग्रामस्थांनी अपघात मृत्यू झालेल्यांना श्रध्दांजली वाहली आणि रस्त्याची पूजा केली. यावेळी आभिषेक नहाटे, सरपंच राजेश वानखडे, कमाल कमल ब्राम्हणे, संतोष वानखडे, किशोर ब्राम्हणे, सुनील वानखडे, भगवान वानखडे, मधुकर घोपे, तेजराव हिरोडे, विलास नहाटे, रामधन वानखडे, विठ्ठल वानखडे, प्रवीण वानखडे, पोलीस पाटील प्रमोद नहाटे, ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश्वर साबळे, रामेश्वर साबळे, गौतम तेलगोटे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. (फोटो)

------------------------

नवरदेवाने केला नवरीचा मेकअप!

अकोटः आपले लग्न जरा हटके व्हावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. लग्नामध्ये नवरी सुंदर दिसावी यासाठी मेकअपला चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र एका लग्नात नवरदेवाने नवरीचा मेकअप केल्याचे पाहावयास मिळाले. अकोट येथील सागर दिगंबरराव गवळी या मेकअप आर्टिस्टची लग्नगाठ अमरावती जिल्ह्यातील प्रतीक्षा सुभाष लकडे या मुलीशी बांधल्या गेली. (फोटो)