क्वारंटीन असलेला आदिवासी मजूर अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:49 IST2020-05-19T16:49:11+5:302020-05-19T16:49:17+5:30
नीलेश रामभाऊ कोकाडे (२७)असे मृतकाचे नाव आहे.

क्वारंटीन असलेला आदिवासी मजूर अपघातात ठार
सायखेड : गत पाच दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातून आलेला व शेतात क्वारंटीन असलेल्या आदिवासी मजुराचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना १८ मे रोजी निंबी (चेलका) रोडवर घडली. नीलेश रामभाऊ कोकाडे (२७)असे मृतकाचे नाव आहे.
नीलेश कोकाडे हा बीड जिल्ह्यातील जेसीबी मशिनवर चालक म्हणून कामाला होता. लॉकडाउन काळात तो गत पाच दिवसापूर्वी मूळगावी निंबी येथे आला व शेतातच क्वारंटीन होता. शेतातून तो धाबा येथे कामानिमित आला असता परत शेतात येत असताना एमएच ३० बीके १०८९ क्रमांकाच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले व विद्युत खांबाला धडकली. यात नीलेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, बहीण, भाऊ, पत्नी, दोन मुली आहेत.
विद्युत खांब देतात अपघातास निमंत्रण
धाबा ते निंबी रोडलगत असलेल्या विद्युत खांबांमुळे अनेकवेळा किरकोळ अपघात घडले. हे विद्युत खांब रोडच्या बाजुलाच असल्याने अपघात घडला आहे. महावितरणने हे खांब रोडच्या सुरक्षित अंतरावर घ्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.