शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह, निमखेड गाव सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 18:19 IST

प्रशिक्षणार्थी पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड गाव सील करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लातूर येथून परतलेला प्रशिक्षणार्थी पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड गाव सील करण्यात आले आहे. दरम्यान, आता गावातील १६७ घरांचे आरोग्य विषयक सर्व्हेक्षण होणार असून येथील लोकसंख्या ही ८३० च्या आसपास आहे.दरम्यान, या पोलिस कर्मचाºयाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील सहा जणांना तपासणीसाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले. या व्यक्तीच्या संपर्कातील व जोखीम नसलेल्या २२ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे.मुंबई येथे कोरोना संसर्गाच्या उद्रेकाच्या पाश्वर्भूमीवर पोलिसांची एक तुकडी राखीव ठेवण्यात आली होती. या तुकडीमध्ये हा पोलिस प्रशिक्षणार्थी होता. दरम्यान, नंतर  त्यांना परत पाठविण्यात आले  होते. परतीच्या प्रवासात या कमर्चाºयाचा लातूर येथील त्याच्या सहकाºयाशी निकटचा संपर्क आला होता. आणि लातूरचा त्याचा सहकारी हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे निमखेड येथे २० मे रोजी पोहोचल्यानंतर या पोलिस कर्मचाºयाने स्वत:ला शेतातच स्वत:चे विलगीकरण करून घेतले होते. दरम्यान, आरोग्य विभागाला याची माहिती लातूर येथून मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने या पोलिस कर्मचाºयाशी संपर्क साधून त्यास २१ मे रोजी बुलडाणा येथील कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल केले. २७ मे रोजी या पोलिस कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्याच्या संपर्कातील सहा जणांना तपासणीसाठी बुलडाणा पाठविण्यात आले असून लो रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना क्वारंटीन करण्यात आले आहे. दुसरीकडे याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार सारिका भगत, तालुका आरोग्य अधिकारी दत्ता मांटे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब मुसदवाले, ग्रामसेवक नंदकिशोर राठोड, सरपंच लक्ष्मण कव्हळे, उपसरपंच परमेश्वर कव्हळे यांच्या सहकाºयाने आता गाव सील करण्यात आले असून हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान चार पथकाद्वारे निमगाव येथील ८३० नागरिक राहत असलेल्या १६७ घरांचे आता आगामी काळात सर्व्हेक्षण करण्यात येत असल्याची माहिती देऊळगाव राजा तालुक्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यासाठी एकूण चार पथके नियुक्त करण्यात आली आहे.  (प्रतिनिधी)

सुरक्षीततेबाबत खबरदारीया प्रशिक्षणार्थी पोलिस कमर्चाºयाने सुरक्षीततेबाबत संपूर्ण खबरदारी घेतली होती. आपला लातूर येथील सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे निदशर्नास आल्यानंतर या पोलिस कमर्चाºयाने स्वत:स विलग करून घेतले होते. कौटुंबिक पातळीवरही त्याने सुरक्षीत अंतर राखले  होते. त्यामुळे त्याच्या पासून अन्य कोणाला फारसे संक्रमण होण्याचा धोका नसल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले. 

शारा येथे निर्जंतुकीकरण मुंबईवरून परतलेल्या संदिग्ध वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर शारा येथे ही महिला राहत असलेल्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. दरम्यान ज्या स्मशानभूमीत या वृद्ध महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेथेही अग्नीश्यामक दलाच्या पथकाने फवारणी करून परिसह निर्जंतुक करण्यात आला आहे. महिलेच्या संपर्कातील ११ जण सध्या बुलडाणा येथे आयसोलेशन कक्षात दाखल असून त्यांच्या चाचण्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

‘त्या’ सफाई कर्मचाºयाच्या पत्नीलाही सुटी४शेगाव येथील सफाई कर्मचारी कोरोना मुक्त झाल्यानंतर दुसºया दिवशी त्याची पत्नीही कोरोना मुक्त झाली आहे. त्यामुळे तिला २७ मे रोजी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयातील आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेगाव येथील आयसोलेशन कक्षात एकही कोरोना बाधीत नाही. दरम्यान, येथे असलेल्या १५ संदिग्ध रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे तर टुनकी येथील पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला खामगाव येथे हलविण्यात आले आहे. शेगाव येथील रुग्णालयाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हे पाऊल उचलण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा