शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उद्या मतमोजणी; यंत्रणा सज्ज

By admin | Updated: October 18, 2014 00:53 IST

अकोला जिल्हय़ातील पाचही मतदारसंघांची मतमोजणीसाठी २२५ मतगणना कर्मचा-यांची नियुक्ती.

अकोला : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्हय़ातील पाचही मतदारसंघांची मतमोजणी ७५ टेबलवर होणार असून, त्यासाठी २२५ मतगणना कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मतगणना पर्यवेक्षक, मतगणना सहाय्यक व सूक्ष्म निरीक्षकांचा समावेश आहे.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हय़ातील आकोट, बाळापूर, अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघातील १ हजार ४८0 मतदान केंद्रांवर बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत पाचही मतदारसंघातील ९३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. त्यामध्ये आकोट मतदारसंघाची मतमोजणी आकोट येथील पोपटखेड रोडवरील आयटीआय येथे, बाळापूर मतदारसंघाची मतमोजणी बाळापूर येथील शासकीय गोदाम येथे,अकोला पश्‍चिम व अकोला पूर्व या दोन मतदारसंघाची मतमोजणी अकोल्यातील खदानस्थित शासकीय धान्य गोदाम येथे आणि मूर्तिजापूर मतदारसंघाची मतमोजणी मूर्तिजापूर येथील शासकीय गोदाम येथे होणार आहे. प्रत्येक मतदारसंघाची मतमोजणी १५ टेबलवर होणार आहे, त्यामध्ये १४ टेबलवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी होणार असून, एका टेबलवर पोस्टल मतांची मतमोजणी होणार आहे. त्यानुसार जिल्हय़ातील पाचही मतदारसंघांची मतमोजणी एकूण ७५ टेबलवर होणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर एक मतगणना पर्यवेक्षक, एक मतगणना सहाय्यक व एक सूक्ष्म निरीक्षक असे तीन कर्मचारी राहणार आहेत. त्यानुसार पाचही मतदारसंघात ७५ टेबलवर होणार्‍या मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून एकूण २२५ मतगणना कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.