मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना वाहनाने चिरडले; तीन ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 11:15 IST2020-12-10T10:41:59+5:302020-12-10T11:15:43+5:30

Accident News मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तिघांना वाहनाने चिरडले; तीन ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

The three, who were on their way to the Morning Walk, were crushed by the vehicle; Three killed, one serious | मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना वाहनाने चिरडले; तीन ठार, एक गंभीर

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना वाहनाने चिरडले; तीन ठार, एक गंभीर

ठळक मुद्देअंजनगाव मार्गावर घडली घटना.एकाचा घटनास्थळी, तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू.

- विजय शिंदे

अकोटः मॉर्निंग वॉक करीता रस्ताने जात असतांना बेदारकपणे वाहन चालविणाऱ्या चालकाने तीन जणांना चिरडले असुन शालिग्राम राऊत, गजानन नेमाडे, उत्तम नाठे यांचा मृत्यु झाला आहे. तर अनंतराव बोरोडे गंभीर जखमी आहे. सदर घटना अकोट-अंजनगाव रोड वर सकाळी घडली. अकोट ग्रामीण पोलीसांनी वाहन व चालकास पकडले आहे. अकोट शहरातील नागरिक दररोज सकाळी मॉर्निंग वॉकवर जात होते. वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूला होत असते. पंरतु आज सकाळी या रस्त्यावर जात असतांना एम एच २०डीइ ७४३३ क्रंमाकाचे टाटा एस ऑटोवाहन चालकांने निष्काळजीपणे,भरघाव बेदारकपणे वाहन चालवताना तिंघाना धडक देत चिरडले. यामध्ये एक जण घटनास्थळी ठार झाला. तर दोघांचा मृत्यु रुग्णालयात उपचारासाठी नेत असतांना झाला आहे. मृतक अकोट येथील शालिग्राम राऊत, गजानन नेमाडे, उत्तम नाठे हे आहेत तर अनंतराव बोरोडे गंभीर जखमी असुन उपचार सुरु आहे. या अपघातात प्रसंगावधान राखल्याने अनेकांचे जीव वाचले आहेत. घटनेची माहीती कळताच अकोट शहर व ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी घाव घेत परिस्थिती हाताळली. अकोट ग्रामीण पोलीसांनी अपघातातील वाहन व आरोपी चालक पकडले. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता शांतता असुन पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: The three, who were on their way to the Morning Walk, were crushed by the vehicle; Three killed, one serious