शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

अकोला जिल्ह्यातील तीन शाळांच्या व्यवस्थापनाला फौजदारी दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:21 PM

अकोला : शासनाने सर्वच शाळांची एकाचवेळी केलेल्या पट पडताळणीत पटसंख्या बोगस असल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात तीन शाळांच्या अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापकांविरुध्द खदान व डाबकी रोड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देराज्यात एकाचवेळी ३ ते ५ आॅक्टोबर २०११ दरम्यान प्राथमिक शाळांमध्ये विशेष पट पडताळणी मोहीम राबवण्यात आली होतीबोगस विद्यार्थी पटावर दाखवून वाढीव तुकडी मागणे, वाढीव तुकड्या दाखवून अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर करून घेण्यात आली होती. शिक्षणाधिकाºयांनी पोलिसात दिलेल्या तक्रारींवरून सुरुवातीला खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार शाळांच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला : शासनाने सर्वच शाळांची एकाचवेळी केलेल्या पट पडताळणीत पटसंख्या बोगस असल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात तीन शाळांच्या अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापकांविरुध्द खदान व डाबकी रोड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्ह्यातील एकूण २२ शाळा व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. यामध्ये डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुमेध मराठी प्राथमिक शाळेच्या अध्यक्षा विजया डोंगरे रा. बाजोरीया ले आउट हिंगना रोड व सचिव नीता देवीदास डोंगरे यांच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मिशन मराठी प्राथमिक शाळेचे अध्यक्ष विजय व्ही. हिवराळे रा. व प्रभारी मुख्याध्यापीका नीलमनी विजय हिवराळे रा. ख्रिश्चन कॉलनी तसेच व्हीएचबी कॉलनीतील मनोहर नाईक प्राथमिक शाळेचे अध्यक्ष नरेश बाबुसिंह नाईक रा. उमरी वाशिम व प्रभारी मुख्याध्यापीका वनीता शंकरराव देशमूख यांच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्यात एकाचवेळी ३ ते ५ आॅक्टोबर २०११ दरम्यान प्राथमिक शाळांमध्ये विशेष पट पडताळणी मोहीम राबवण्यात आली होती. मोहिमेदरम्यान ज्या शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत ५० टक्केपेक्षा कमी उपस्थिती होती. परंतु, अनेक शाळांमध्ये पदे वाचविण्याच्या दृष्टिकोनातून बोगस विद्यार्थी पटावर दाखवून वाढीव तुकडी मागणे, वाढीव तुकड्या दाखवून अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर करून घेण्यात आली होती. तसेच या शाळांनी शासनाच्या शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्तीचा सुद्धा लाभ घेतला होता. शासनाची आर्थिक फसवणूक करून, खोटी कागदपत्रे बनवून ती खरी असल्याचे भासविल्याने या शाळा, मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, अकोट गट शिक्षणाधिकाºयांनी पोलिसात दिलेल्या तक्रारींवरून सुरुवातीला खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार शाळांच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या शाळांना फौजदारी झटका!डाबकी रोड पोलीस स्टेशन - सुमेध मराठी प्राथमिक शाळा, डाबकी रोड,खदान पोलीस स्टेशन -मिशन मराठी प्राथमिक शाळा ख्रिश्चन कॉलनी, सानिया उर्दू प्राथमिक शाळा ख्रिश्चन कॉलनी, मनोहर नाईक प्राथमिक शाळा, व्हीएचबी कॉलनी.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणSchoolशाळा