शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

थ्री फेज लाईन तीन दिवसांपासून बंद

By admin | Updated: June 5, 2014 00:09 IST

आकोली जहाँगीर येथील ग्रामस्थांचा आकोट कार्यालयावर ठिय्या.

आकोली जहाँगीर : आकोट तालुक्यातील आकोली जहाँगीर परिसरात १ जूनला झालेल्या वादळामुळे खंडित झालेला थ्री फेजचा विद्युत पुरवठा तीन दिवस उलटूनही व्यवस्थित दुरुस्ती करण्यात आला नाही. परिणामी शेतीतील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांनी पणज व आकोट येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. वीज वितरण कंपनीच्या पणज उपकेंद्रांतर्गत आकोली जहाँगीर परिसरात १ जूनला अचानक आलेल्या वादळीवार्‍यासह पावसाने कहर केला. यामध्ये बागायती पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यासोबतच परिसरातील विद्युत तारा व खांबसुद्धा क्षतिग्रस्त झाल्याने तीन दिवसांपासून या भागात थ्री फेजचा वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे बचावलेल्या पिकांचे संगोपन करण्यासाठी कृषीपंपांना विजेची नितांत गरज आहे. पिकांना पाण्याची गरज असताना तीन दिवसांपासून बंद असलेल्या वीज पुरवठय़ामुळे शेतीचे नुकसान होत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी पणज उपकेंद्रावर धाव घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, याठिकाणी त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते अधिक संतप्त झाले आणि त्यांनी सरळ आकोट येथील साहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयावर धाव घेऊन आपले गार्‍हाणे ऐकण्यासाठी ठिय्या दिला. येथे साहाय्यक अभियंता चव्हाण यांनी शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून लगेच वरिष्ठांशी संपर्क केला. त्यानुसार आकोली जहाँगीर परिसरातील दुरुस्तीच्या कामास अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून त्वरित सुरुवात करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन त्यांनी शेतकर्‍यांना दिले.