शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

अकोल्याहून जाणार आणखी तीन विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 11:31 AM

अप व डाउन अशा सहा गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.

ठळक मुद्देकेवळ आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येईल.अकोला रेल्वेस्थानकावरही थांबा देण्यात आला आहे.

अकोला : ‘अनलॉक-४ अंतर्गत रेल्वेची प्रवासी वाहतूक हळूहळू सुरू करण्यात येत असून, मध्य रेल्वेकडून शनिवार, १२ सप्टेंबरपासून गुजरात ते ओडिशा राज्यादरम्यान आणखी तीन विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावरही थांबा देण्यात आला आहे. अप व डाउन अशा सहा गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे. या गाड्यांमधून केवळ आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येईल.खुर्दा रोड ते अहमदाबादगाडी क्रमांक - ०२८४३ अप खुर्दा रोड ते अहमदाबाद ही विशेष गाडी १२ सप्टेंबरपासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवारी सायंकाळी १८.४० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी अहमदाबादला ०७.२५ ला पोहचेल. ही गाडी दर बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे चार दिवस सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटला अकोला स्थानकावर येईल. नांदुरा व मलकापूर येथेही थांबा असणार आहे. गाडी क्रमांक - ०२८४४ डाउन अहमदाबाद-खुर्दा रोड ही गाडी दर मंगळवार, शुक्रवार, रविवार व सोमवार असे चार दिवस सकाळी ०६.३५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.खुर्दा रोड ते ओखागाडी क्रमांक - ०८४०१ अप खुर्दा रोड ते ओखा ही विशेष गाडी दर सोमवारी दुपारी २ वाजून १० मिनिटला अकोला स्थानकावर येईल. या गाडीला शेगाव, मलकापूर येथेही थांबे आहेत. गाडी क्रमांक - ०८४०२ डाऊन ओखा ते खुर्दा रोड ही गाडी दर गुरुवारी सकाळी ०६.३५ वाजता अकोला स्थानकावर येईल.खुर्दा रोड ते गांधीधाम  गाडी क्रमांक - ०२९७४ अप खुर्दा रोड ते गांधीधाम ही विशेष गाडी दर रविवारी दुपारी १२.१९ वाजता अकोला स्थानकावर येईल. या गाडीला मलकापूर येथेही थांबा असणार आहे. गाडी क्रमांक - ०२९७३ डाऊन गांधीधाम- खुर्दा रोड ही गाडी दर गुरुवारी दुपारी ४.४० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.अकोलेकरांसाठी आता १२ विशेष गाड्याअकोला रेल्वेस्थानकावरून अहमदाबाद-हावडा, मुंबई-हावडा व अहमदाबाद-पुरी या तीन जोडी विशेष रेल्वे गाड्या साप्ताहिक स्वरूपात धावत आहेत. यामध्ये आता आणखी तीन जोडी विशेष गाड्यांची भर पडली आहे. यामुळे अकोलेकरांच्या दिमतीला आता अप व डाउन अशा एकूण १२ विशेष गाड्या असणार आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcentral railwayमध्य रेल्वेAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक