वाशिम, हिंगोली, नांदेडसाठी आणखी तीन विशेष रेल्वे गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 16:01 IST2020-12-21T16:01:11+5:302020-12-21T16:01:20+5:30
Trains For Nanded and Washim या गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने वाशिम, हिंगोली व नांदेडला जाणा-या प्रवाशांची सोय झाली आहे.

वाशिम, हिंगोली, नांदेडसाठी आणखी तीन विशेष रेल्वे गाड्या
अकोला : अनलॉकच्या प्रक्रियेंतर्गत दक्षिण-मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड – श्रीगंगानगर-हुजूर साहिब नांदेडदरम्यान दोन विशेष गाड्या आणि सिकंदराबाद-जयपूर-सिकंदराबाददरम्यान एक गाडी अशा तीन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने वाशिम, हिंगोली व नांदेडला जाणा-या प्रवाशांची सोय झाली आहे.
गाडी संख्या ०२४३९ हु. सा. नांदेड ते श्रीगंगानगर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २७ डिसेंबर, २०२० ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान दर रविवारी सकाळी ११.०५ वाजता हुजूर साहिब नांदेड येथून सुटेल आणि हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे रात्री २०.१५ वाजता श्रीगंगानगर येथे पोहोचेल. गाडी संख्या ०२४४० श्रीगंगानगर ते हु. सा. नांदेड साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस दिनांक २५ डिसेंबर, २०२० ते २९ जानेवारी, २०२१ दरम्यान दर शुक्रवारी दुपारी १३.२५ वाजता श्रीगंगानगर येथून सुटेल आणि अकोला, वाशिम, हिंगोली मार्गे रात्री २१.४० वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल.
गाडी संख्या ०२४८५ हु. सा. नांदेड ते श्रीगंगानगर विशेष द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक २४ डिसेंबर, २०२० ते ०१ फेब्रुवारी २०२१ दरम्यान दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी ११.०५ वाजता हुजूर साहिब नांदेड येथून सुटेल आणि हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे रात्री १९.०० वाजता श्रीगंगानगर येथे पोहोचेल.
गाडी संख्या ०२४८६ श्रीगंगानगर ते हु. सा. नांदेड द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेस दिनांक २२ डिसेंबर, २०२० ते ३० जानेवारी, २०२१ दरम्यान दर मंगळवार आणि शनिवारी दुपारी १४.४५ वाजता श्रीगंगानगर येथून सुटेल आणि अकोला, वाशिम, हिंगोली मार्गे रात्री २१.४० वाजता नांदेड येथे पोहोचेल.
गाडी संख्या ०९७१४ सिकंदराबाद ते जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ डिसेंबर २०२० ते ०१ फेब्रुवारी २०२१ दरम्यान दर सोमवारी सिकंदराबाद येथून रात्री २१.४० वाजता सुटेल आणि नांदेड, हिंगोली, अकोला, भोपाल, उज्जैन, कोटा मार्गे जयपूर येथे सकाळी ०६.४५ वाजता पोहोचेल.
गाडी संख्या ०९७१३ जयपूर ते सिकंदराबाद साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २६ डिसेंबर २०२० ते ३० जानेवारी २०२१ दरम्यान दर शनिवारी जयपूर येथून रात्री २२.३५ वाजता सुटेल आणि कोटा, उज्जैन, भोपाल, अकोला, हिंगोली, नांदेड मार्गे सिकंदराबाद येथे सकाळी ०६.५० वाजता पोहोचेल.