शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

महिलेवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात आणखी तिघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 1:46 PM

या प्रकरणात दोन आरोपींना बुधवारीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी

अकोला: येवता ते मलकापूर रोडवरील एका कोरड्या खदानीत शहरातील एका ४५ वर्षीय महिलेवर पाच युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली होती. या प्रकरणात दोन आरोपींना बुधवारीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी आणखी तिघांना अटक केली. न्यायालयाने तिघांची ७ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.एमआयडीसी परिसरात एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय युवकाचे ४५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे दोघेही कैलास नगरात एकत्र राहत होते. त्यांच्या नातेसंबंधाला युवकाच्या नातेवाइकांचा विरोध होता; मात्र हा विरोध झुगारून ते एकत्र राहात होते. युवकाच्या मोठ्या भावाने दोघांनाही घरी चला अशी भूलथाप दिली आणि बुधवारी महिलेला त्याच्या घरी नेण्यासाठी आला. यावेळी त्याच्या सोबत तीन ते चार मित्रही होते. महिलेला घराकडे घेऊन जात असतानाच ते येवता-मलकापूर रोडवरील अंधारातील एका खदानजवळ पाच जणांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी आरोपी मनोज राऊत (२२), आकाश दत्ता (२३) यांना बुधवारी रात्रीच अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी शिवणीतील बहुजन नगरात राहणारे सुनील अभ्यंकर (४३), आकाश खंडारे (२४), गजानन कांबळे (३८) यांना अटक केली. तिघा आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची ७ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीGang Rapeसामूहिक बलात्कार