शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

अकोला महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी भाजपाच्या तीन, काँग्रेसच्या एका उमेदवाराची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:43 AM

अकोला : महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवड प्रक्रियेत भाजपाची  सरशी झाली आहे. मनपाच्या मुख्य सभागृहात पाचपैकी चार सदस्यांकरिता  निवड प्रक्रिया पार पडली असता भाजपाच्या ताब्यात तीन जागा गेल्या आहेत. उर्वरित एका जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देभाजपाने गाठला ५१ चा आकडा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवड प्रक्रियेत भाजपाची  सरशी झाली आहे. मनपाच्या मुख्य सभागृहात पाचपैकी चार सदस्यांकरिता  निवड प्रक्रिया पार पडली असता भाजपाच्या ताब्यात तीन जागा गेल्या आहेत.  उर्वरित एका जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराची निवड करण्यात आली. या निवड  प्रक्रियेमुळे महापालिकेत भाजप नगरसेवकांचे संख्याबळ ५१ झाले आहे.महापालिकेच्या निवडणुकीत अकोलेकरांनी भाजपाला ८0 जागांपैकी ४८  जागांवर विजयी क रीत एकहाती सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करून दिला हो ता. सत्ता पक्षाने १६ सदस्यीय स्थायी समितीचे गठन केल्यानंतर झोननिहाय  सभापतींच्या नियुक्त्या केल्या. मागील आठ महिन्यांपासून पाच स्वीकृत सदस्य  पदाची निवड प्रक्रिया रखडली होती. निकषानुसार सत्ता पक्षाचे संख्याबळ लक्षा त घेता भाजपाकडून तीन, तर काँग्रेसच्या १३  संख्याबळानुसार एका सदस्याची  वर्णी लागणार होती. उर्वरित एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित लोकशाही  आघाडी व शिवसेनेचे संख्याबळ समान नऊ झाल्यामुळे तांत्रिक पेच निर्माण  झाला होता. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत  नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेमुळे स्वीकृत  सदस्य पदाच्या निवड प्रक्रियेवर संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर  करण्याचे काम भाजयुमोचे पदाधिकारी गिरीश गोखले यांनी केले. याप्रकरणी  गोखले यांनी नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली असता द्विसदस्यीय  खंडपीठाने पाचपैकी एक सदस्य पदाला वगळून उर्वरित चार सदस्यांची निवड  करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानुषंगाने महापौर विजय अग्रवाल यांनी  गुरुवारी स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. 

मनपा आवारात आतषबाजीस्वीकृत सदस्य पदासाठी भाजपा व काँग्रेस उमेदवारांची निवड होताच मनपा  आवारात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. नवनियुक्त  नगरसेवकांनी खासदार संजय धोत्रे, आ.गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष किशोर  मांगटे पाटील यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्या दालनात  नगरसेविका विभा राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

अखेर गोखलेंची ‘एन्ट्री’झाली!२0१२ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्यावतीने गिरीश गो खले विद्यमान महापौर विजय अग्रवाल यांच्या विरोधात दंड थोपटून उभे होते.  त्या निवडणुकीत गोखले यांचा निसटता पराभव झाला होता. पक्षनिष्ठ, धड पड्या व पाठीशी कार्यकर्त्यांची फळी असणार्‍या गोखले यांना २0१७ मधील  निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारले. अखेर स्वीकृत सदस्य पदाच्या माध्यमा तून का होईना, गिरीश गोखले यांची मनपात ‘एन्ट्री’ झाली आहे. आगामी चार  वर्षांच्या कालावधीसाठी ते सभागृहात कोणती भूमिका निभावतात, याबद्दल उ त्सुकता लागली आहे.

प्रस्ताव राजपत्रासाठी पाठविण्याचे निर्देशदोन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी सादर केलेले लखोटे महापौर विजय अग्रवाल यांनी  उघडले. त्याचे वाचन भाजपाचे गटनेता राहुल देशमुख यांनी करीत नवनिर्वाचि त नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. महापौर विजय अग्रवाल यांनी नवनियुक्त  नगरसेवकांचे प्रस्ताव राजपत्रात नोंद करण्यासाठी शासनाकडे पाठविण्याचे  निर्देश नगर सचिव अनिल बिडवे यांना दिले.

गटनेत्यांनी सादर केले लखोटेस्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त एस. रामामूर्ती, प्रभारी उ पायुक्त प्रा. संजय खडसे उपस्थित होते. दोन्ही अधिकार्‍यांच्या समक्ष भाजपाचे  गटनेता राहुल देशमुख यांनी डॉ. विनोद बोर्डे, गिरीश गोखले व सुजीत ठाकूर  यांच्या नावाचा तर काँग्रेसचे गटनेता साजीद खान पठाण यांनी विभा राऊत  यांच्या नावाचा लखोटा महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे सादर केला.-

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसAkola cityअकोला शहरMuncipal Corporationनगर पालिका