युवकाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 17:58 IST2020-06-09T17:58:10+5:302020-06-09T17:58:33+5:30

अकोट फैल पोलिसांनी तीन जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Three arrested in youth murder case | युवकाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

युवकाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

अकोला : अकोट फैल परिसरातील भोईपुरा येथील रहिवासी प्रवीण कांबळे यांना त्यांच्या शेजारीच राहत असलेल्या गोलू कांबळे आणि अविनाश कांबळे यांनी ढकलून दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी तीन जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची म्हणजेच ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
भोईपुरा येथे असलेल्या मच्छी मार्केटमध्ये प्रवीण विजय कांबळे (४०) याने गणेश विश्वनाथ कांबळे त्यांचा मुलगा गोलू गणेश कांबळे आणि अविनाश गणेश कांबळे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते; मात्र या बाप-लेकांनी प्रवीणला दारू पिण्यास पैसे न दिल्याने त्याने तिघांनाही अश्लील शिवीगाळ केली. प्रवीणची शिवीगाळ असह्य झाल्यानंतर कांबळे पिता-पुत्राने त्याला ढकलले असताना अशक्त असलेला प्रवीण कांबळे जमिनीवर खाली कोसळला. जमिनीवर कोसळल्याने त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे अविनाश कांबळे, गोलू कांबळे याच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रवीण कांबळे यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास प्रवीण कांबळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी गणेश विश्वनाथ कांबळे तसेच त्यांचा मुलगा गोलू गणेश कांबळे आणि अविनाश गणेश कांबळे या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर तीनही आरोपींना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

 

Web Title: Three arrested in youth murder case