शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

हजारो मुलांना मातेपासून एड्सची लागण!

By admin | Updated: June 12, 2015 02:01 IST

गर्भधारणेदरम्यान योग्य उपचार न केल्यामुळे पाच वर्षांत ११५३ मुलांना एड्सची लागण झाली.

विवेक चांदूरकर/अकोला : मातेपासून एड्ससारख्या जीवघेण्या आजाराची लागण झालेल्या मुलांची संख्या राज्यात हजारोंच्या घरात आहे. गर्भधारणेदरम्यान मातेने योग्य उपचार न केल्यामुळे पाच वर्षांत ११५३ मुलांना डोळे उघडण्यापूर्वीच या भयंकर रोगाने ग्रासले आहे. देशात एड्सविषयी कितीही जनजागृती होत असली तरी, या आजाराची लागण होणार्‍या रूग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. एड्स प्रामुख्याने तीन प्रकारांमधून होतो. एड्सग्रस्त व्यक्तीशी असुरक्षित संबंध, एड्सबाधीत व्यक्तीने कलेले रक्तदान, एड्सग्रस्त व्यक्तीला दिलेले इंजेक्शन वापरण्यात येणे या बाबींचा समावेश आहे. यासोबतच मातेपासून मुलांनाही एड्सची लागण होते. मातेपासून मुलांना एड्सची लागण होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. २00९ ते १0 या वर्षात २१३ मुलांना मातेपासून एड्सची लागण झाली होती. २0१0-११ वर्षात १६७ मुलांना, २0११-१२ वर्षात २१७ मुलांना, २0१२-१३ वर्षात २५३ मुलांना, २0१३-१४ वर्षात १७३ मुलांना, तर २0१४ -१५ वर्षात १३0 मुलांना मातेपासून एड्सची लागण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोयायटी मुंबईने माहितीच्या अधिकारात दिली आहे. मातेने योग्य मार्गदर्शनात उपचार घेतले तर जन्माला येणारे मुल एड्समुक्त असू शकते; मात्र अनेक एड्सग्रस्त महिला उपचार घेत नाहीत. परिणामी निष्पाप जीवाला आयुष्याची शिक्षा भोगावी लागते.*एड्सग्रस्त महिलेलाही होवू शकते एड्समुक्त मूल एड्सग्रस्त महिलेला गर्भधारणा झाली, तरीही तिला होणारे मूल एड्समुूक्त होवू शकते; मात्र त्याकरिता महिलेने गर्भधारणेपासूनच डॉक्टरांशी सल्ला-मसलत करून योग्य उपचार करून घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधी नियमित घ्यायला हवी. वर्ष              मातेपासून एचआयव्हीबाधित रूग्ण २00९ - १0               २१३ २0१0 - ११                १६७ २0११ - १२                २१७ २0१२ - १३                 २५३ २0१३ - १४                  १७३२0१४ - १५                  १३0