सेंट्रल बँकेचे एटीएम फोडले; दहा लाखांची रक्कम पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:25 IST2019-01-18T15:24:28+5:302019-01-18T15:25:23+5:30
पातूर : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातूर -अकोला रोडवरील कापसी गावातील सेंट्रल बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून दहा लाख रुपयांची रक्कम पळविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

सेंट्रल बँकेचे एटीएम फोडले; दहा लाखांची रक्कम पळविली
पातूर : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातूर -अकोला रोडवरील कापसी गावातील सेंट्रल बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून दहा लाख रुपयांची रक्कम पळविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांनी त्यांच्या पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली. अकोला पोलीस उपअधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी बाळापूर सोहेल शेख , स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. सेंट्रल बँक शाखा कापसीचे व्यवस्थापक राहुल प्रतीते यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध कलम ३८०,४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यामध्ये एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनासारखी गाडी या गुन्ह्यासाठी वापरण्यात आल्याची माहीत सूत्रांनी दिली. अकोला येथील श्वानपथकही घटनास्थळी दाखल झाले होते.