Video: व्याळा येथील शाळेनजीक साप-मुंगासाच्या लढाईचा थरार; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

By रवी दामोदर | Updated: July 13, 2022 16:14 IST2022-07-13T16:14:40+5:302022-07-13T16:14:46+5:30

तीन मुंगसाच्या हल्ल्यात सापाचा मृत्यू

The thrill of a snake-mongoose fight near a school in Vyala; Video goes viral on social media | Video: व्याळा येथील शाळेनजीक साप-मुंगासाच्या लढाईचा थरार; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

Video: व्याळा येथील शाळेनजीक साप-मुंगासाच्या लढाईचा थरार; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

अकोला: नाग आणि मुंगूसाचं वैर हे सगळ्यांनाच माहित आहे. अशातच भरपावसात व्याळा येथील श्रीमती यशोदाबाई इंगळे महाविद्यालयाच्यासमोर रस्त्यावर नाग आणि मुंगूस समोरांसमोर आले, अन् सुरू झाला मृत्यूचा थरार. आक्रमक झालेल्या तीन मुंगसाच्या हल्ल्यात सापाचा मृत्यू झाला आहे. या लढाईचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसाच्या दिवसात भरदिवसा बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील श्रीमती यशोदाबाई इंगळे महाविद्यालयाच्या समोर तीन मुंगूस व एक साप एकमेकांसमोर आले. सर्वांना परिचित असलेले वैर अन् त्यात ते एकमेकांच्या समोर आल्यावर दोघांमध्ये लढाईचा थरार सुरू झाला. कधी मुंगुस हल्ला करत होता, तर कधी साप. मात्र तीन मुंगुसाच्या हल्ल्यात सापाचा मृत्यू झाला. ही लढाई जवळपास पाच ते दहा मिनिटे सुरू होती. भर रस्त्यात लढाईचा थरार सुरू असल्याने नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, एकाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये घेतला असून, आता तो व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Web Title: The thrill of a snake-mongoose fight near a school in Vyala; Video goes viral on social media