Thane: आई-वडील कामावर; मुलीचे वागळे इस्टेट भागातून अपहरण 

By जितेंद्र कालेकर | Published: May 19, 2024 09:37 PM2024-05-19T21:37:21+5:302024-05-19T21:37:46+5:30

Thane crime News: वागळे इस्टेट, नेहरूनगर भागातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी तिच्या पालकांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, तिचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी दिली.

Thane: Parents at work; Abduction of girl from Wagle Estate area | Thane: आई-वडील कामावर; मुलीचे वागळे इस्टेट भागातून अपहरण 

Thane: आई-वडील कामावर; मुलीचे वागळे इस्टेट भागातून अपहरण 

- जितेंद्र कालेकर 
ठाणे - वागळे इस्टेट, नेहरूनगर भागातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी तिच्या पालकांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, तिचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी दिली.

मुलीचे वडील ट्रकचालक असून आई परिसरात घरकाम करते. १७ मे २०२४ रोजी तिचे वडील कामावर गेले होते; तर आई रघुनाथनगर भागात कामावर गेली होती. दुपारी दोन वाजता मुलगी काही कामानिमित्त घराबाहेर पडली. संध्याकाळी पाच वाजता तिची आई घरी परतली. तोपर्यंत ती घरी परतलीच नाही. तिच्या आईने आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. तिचा मोबाइलही न लागल्याने नातेवाइक तसेच मित्रपरिवाराकडे तिचा शोध घेण्यात आला. तिकडेही ती न आढळल्याने तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त करीत तिच्या आईने १८ मे २०२४ रोजी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तिचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितले.

Web Title: Thane: Parents at work; Abduction of girl from Wagle Estate area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.