शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’ला डिसेंबरचा मुहूर्त?

By admin | Updated: September 20, 2014 20:06 IST

२३ सप्टेंबरला शिक्षणाधिका-यांची बैठक; १५ डिसेंबरवरच एकमत होण्याची शक्यता.

वाशिम: शिक्षकांची पात्रता तपासण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने गतवर्षापासून सुरू केलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी )यंदाही डिसेंबर महिन्यातच होणार असल्याचे वृत्त आहे. टीईटीच्या नियोजनासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २३ सप्टेंबरला राज्यभरातील शिक्षणाधिकार्‍यांची बैठक बोलाविली असून, त्या बैठकीत परिक्षेचे वेळापत्रक ठरणार आहे. सदर परीक्षा गतवर्षीप्रमाणे यावर्षीही १५ डिसेंबरलाच घेण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे.राज्यात बीएड् ही पदवी व डीटीएड् ही पदविका मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्या तुलनेत शिक्षकांच्या रिक्त जागा अत्यल्प आहेत. परिणामी, सर्वांना शिक्षकाची नोकरी देणे शालेय शिक्षण विभागाला शक्य नाही. दुसरीकडे पदवी व पदविका प्राप्त करूनही नोकरी मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण विभागाप्रती रोष वाढत आहे. यावर तोडगा म्हणून शिक्षकाच्या नोकरीसाठी शासनाने ह्यटीईटीह्णची चाळण निर्माण केली. ही परीक्षा उत्तीर्ण होणार्‍यांना अग्रक्रमाने सीईटी परीक्षा दे ता येते, तसेच नोकरीची संधी मिळते. गतवर्षी झालेल्या राज्यातील हजारो विद्यार्थी टीईटीला बसले होते; मात्र उत्तीर्ण होणार्‍यांचा टक्का फारच कमी होता. गतवर्षी अनुत्तीर्ण झालेल्यांसह नव्याने डीटीएड् व बीएड् पूर्ण केलेल्यांना ही परीक्षा नव्याने देता यावी, यासाठी परीक्षा परिषदेने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने येत्या २३ सप्टेंबरला पुणे येथे राज्यभरातील शिक्षणाधिकार्‍यासंह शिक्षण विभागाच्या महत्वाच्या अधिकार्‍यांची बैठक बोलाविली आहे. सदर बैठकीत टीईटीच्या वेळापत्रक व नियोजनाबाबत सखोल चर्चा होणार आहे. गतवर्षी जाणविलेल्या उणिवा दूर करण्यावरही चर्वि तचर्वण होणार असून, गतवर्षीप्रमाणे यंदाही १५ डिसेंबरलाच परीक्षा घेता येईल का, याची चाच पणीही बैठकीत करण्यात येणार आहे.