शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे अधिवेशन आता अशैक्षणिक कालावधीतच!

By admin | Updated: September 20, 2014 20:08 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाचा निर्णय.

वाशिम: राज्यातील विविध शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांच्या संघटनांची अधिवेशने यापुढे अशैक्षणिक कालावधीत, म्हणजेच दीर्घकालीन सुट्यांमध्येच घेण्याचा आदेश, राज्य शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने काढला आहे.शैक्षणिक कालावधीत अधिवेशन घेतल्यास, अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांकडून रजा घेतल्या जातात आणि परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. अशा अधिवेशनांच्या काळात अनेक शाळा बंद राहत असल्याने, विधिमंडळात शासनावर प्रखर टीका झाली होती. त्यावेळी या प्रकाराला आवर घालण्यासाठी निश्‍चित धोरण आखण्याचे आश्‍वासन शासनाच्या वतीने देण्यात आल्या होते. या पार्श्‍वभूमीवर, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना काही अटींवरच अधिवेशनांना हजर राहण्यासाठी मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने यासंदर्भात १५ सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, अधिवेशनाचे आयोजन करणारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची संघटना मान्यताप्रा प्त असावी, अधिवेशन दीर्घकालीन सुट्यांमध्येच घेण्यात यावे, अधिवेशनासाठी शासनाची पूर्व परवानगी घेतलेली असावी, अधिवेशनामध्ये अशैक्षणिक कामांचा समावेश नसावा, शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रबोधनात्मक कामांचाच अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत समावेश असावा आणि राज्यस् तरीय अधिवेशन तीन दिवस, तर जिल्हास्तरीय अधिवेशन दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे असू नये. यापूढे अधिवेशन कालावधीमध्ये शासनाकडून कोणत्याही प्रकारचा वित्तीय लाभ व सवलती मिळणार नाहीत, तसेच जिल्हास्तरीय अधिवेशनाकरिता प्रवासाचा कालावधी अनुट्ठोय राहणार नसून, उपस्थितीच्या प्रमाणपत्राशिवाय शिक्षकांची अधिवेशनांमधील उपस्थिती ग्राह्य धरली जाणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. *** राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांच्या संघटनांतर्फे, त्यांच्या विविध मागण्या व इतर प्रश्नांकरिता दोन ते तीन दिवस कालावधीची अधिवेशने आयोजित केली जातात. आपल्या सदस्यांना अधिवेशन काळ, तसेच अधिवेशनस्थळी जाण्यायेण्याकरिता नैमित्तीक रजा देण्यात यावी, अशी मागणी या संघटनांकडून केली जाते. शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून ही मागणी मान्य केली जात नाही; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकीय विभागाकडून सदर मागणी मान्य करण्यात येत असल्याने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिवेशनांना मोठय़ा प्रमाणात उपस्थिती लावतात आणि परिणामी अधिवेशनांच्या कालावधीत शाळा बंद राहण्याचे प्रकार सातत्याने घडत होते.