शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’च्या जनजागृतीसाठी होणार तालुकानिहाय कार्यशाळा

By admin | Updated: April 12, 2017 21:44 IST

अकोला विक्रीकर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोहीम

अकोला : ‘जीएसटी’ विद्येयकास मंजुरी मिळाली असून, आगामी जुलै महिन्यापासून देशभरात जीएसटी लागू होत आहे. जीएसटी म्हणजे काय, त्याची आवश्यकता कशासाठी आहे, याबाबत जनजागृती करण्यासाठी अकोला जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. अकोला विक्रीकर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून, अकोलासह पातूर, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट आणि तेल्हारा येथे टप्प्याटप्प्याने जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. तालुक्यातील नोंदणीकृत करदाते आणि उद्योजकांना कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.‘जीएसटी’च्या अंमलबजावणीसाठी अकोला येथील विक्रीकर कार्यालयात तात्पुरती नोंदणी सुरू झाली असून चेन्नई, मुंबई आणि अमरावती येथे प्रशिक्षण घेऊन आलेले अधिकारी ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्वायत्ततेचा प्रश्न परिषदेने निकाली काढल्यानंतर आता जीएसटी लागू करण्याची मोहीम देशभरात जोरात सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यातील विक्रीकर कार्यालयात ‘जीएसटी’ची तात्पुरती नोंदणी सुरू झाली आहे. राज्य आणि केंद्राची चमू यासाठी कामाला लागली आहे. दिल्लीपासून तर लहान-लहान जिल्ह्यापर्यंत प्रशिक्षण दिले जात आहे. व्हॅट भरणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आता ‘जीएसटी’ची तात्पुरती नोंदणी करून घेतली जात आहे. अकोल्यात असलेल्या व्यापाऱ्यांनादेखील नोंदणी करण्याचे आणि मागील व्हॅटचा भरणा करण्याचे आवाहन केले आहे. अकोल्यात सात हजार डिलर असून, त्यांना तात्पुरती नोंदणी करण्याचे सुचविण्यात आले असून, अनेकांनी त्याचा लाभही घेतला आहे. ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी आणि ‘जीएसटी’च्या जनजागृतीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर कार्यक्रम घेतले जात आहेत. तालुक्याच्या या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ लवकरच होणार असून, विक्रीकर अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये प्रामुख्याने सहभागी होणार आहेत.  

जिल्ह्याच्या प्रत्येक तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्याचे आदेश शासनाचे आहेत. त्यानुसार विक्रीकर विभागाच्यावतीने आम्ही कार्यक्रम आखला आहे. उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी कार्यशाळेतून त्यांच्या शंकांचे निरसन करून घ्यावे.- सुरेश शेंडगे, आयुक्त, विक्रीकर विभाग, अकोला.