तलाठी-मंडळ अधिकाऱ्यांना मिळणार संपकाळातील वेतन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:34 IST2018-04-10T15:34:13+5:302018-04-10T15:34:13+5:30

अकोला : राज्य तलाठी पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्यावतीने गत नोव्हेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या तलाठी व मंडळ अधिकाºयांच्या संपकाळातील नऊ दिवसांच्या अनुपस्थितीचा कालावधी अर्जित रजेतून नियमित करून वेतन अदा करण्याचा आदेश शासनामार्फत ५ एप्रिल रोजी काढण्यात आला आहे.

Talati-Board officials will get salaries! | तलाठी-मंडळ अधिकाऱ्यांना मिळणार संपकाळातील वेतन!

तलाठी-मंडळ अधिकाऱ्यांना मिळणार संपकाळातील वेतन!

ठळक मुद्देगत १६ ते २४ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले होते. . शासनाच्या २८ जून २०१७ रोजीच्या आदेशानुसार संपकाळातील नऊ दिवसांचे वेतन कपात करण्यात आले होते. नऊ दिवसांचा अनुपस्थितीचा कालावधी विशेष बाब म्हणून अर्जित रजेतून नियमित करण्यात येणार असून, संपकाळातील वेतन अदा करण्यात येणार आहे.


अकोला : राज्य तलाठी पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्यावतीने गत नोव्हेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या तलाठी व मंडळ अधिकाºयांच्या संपकाळातील नऊ दिवसांच्या अनुपस्थितीचा कालावधी अर्जित रजेतून नियमित करून वेतन अदा करण्याचा आदेश शासनामार्फत ५ एप्रिल रोजी काढण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांना संपकाळातील वेतन लवकरच मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्यावतीने विविध मागण्यांसंदर्भात गत १६ ते २४ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात राज्यातील तलाठी व मंडळ अधिकारी सहभागी झाले होते. शासनाच्या २८ जून २०१७ रोजीच्या आदेशानुसार संपकाळातील नऊ दिवसांचे वेतन कपात करण्यात आले होते. हा आदेश रद्द करून १६ ते २४ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत सामूहिक रजा आदोलनात (संपात) सहभागी झालेल्या तलाठी व मंडळ अधिकाºयांचा नऊ दिवसांचा अनुपस्थितीचा कालावधी विशेष बाब म्हणून अर्जित रजेतून नियमित करण्यात येणार असून, संपकाळातील वेतन अदा करण्यात येणार आहे. यासंबंधीचा आदेश ५ एप्रिल रोजी शासनामार्फत काढण्यात आला असून, यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांनी पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.

शासनाच्या आदेशानुसार संपकाळातील तलाठी, मंडळ अधिकाºयांचा नऊ दिवसांचा कालावधी अर्जित रजेत रूपांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे संपकाळातील कपात करण्यात आलेले तलाठी व मंडळ अधिकाºयांचे वेतन मिळणार आहे.
-नीळकंठ नेमाडे
अध्यक्ष, महसूल मंडळ अधिकारी संघटना, अकोला जिल्हा.

 

Web Title: Talati-Board officials will get salaries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.