शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

गाळ काढून तळ्यांच्या स्वच्छतेवर भर

By admin | Updated: February 24, 2015 00:22 IST

जलयुक्त शिवार अभियान; मुख्यमंत्र्यांची बैठक बुधवारी.

अकोला : पाणटंचाईच्या स्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये तळ्यांमधील गाळ काढून तळी स्वच्छ करण्याच्या कामांवर भर देण्यात येणार आहे. राज्यात वारंवार उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या स्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राज्य शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाच्या विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ढाळीचे बांध, शेततळे, माती नालाबांध, सलग समतल चर, साखळी सिमेंट काँक्रीट बंधारा, नाला खोलीकरण व रुंदीकरण, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, साठवण बंधार्‍यांची दुरुस्ती, पाझर तलाव, सिंचन तलाव, विहीर आणि बोअरचे पुनर्भरण तसेच इतर प्रकारच्या कामांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियानातील या जलसंधारणाच्या कामांमध्ये प्रामुख्याने गावतलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव, साठवण तलाव, शिवकालीन तलाव, ब्रिटिशकालीन तलाव व निजामकालीन तलावांमधील साचलेला गाळ काढण्याची कामे केली जाणार आहेत. गाळ काढून खोलीकरणासह तळी स्वच्छ करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानात तळ्यांमधील गाळ काढून तळी स्वच्छ करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुषंगाने मुख्यमंत्री २५ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्तांची बैठक घेणार असल्याचे अमरावती येथील विभागीय उपायुक्त (रोहयो) एस. टी. टाकसाळे यांनी स्पष्ट केले. *मुख्यमंत्र्यांची बैठक बुधवारी! जलयुक्त शिवार अभियानात तळ्यांमधील गाळ काढून ती स्वच्छ व खोल करण्यावर भर दिला जाणार आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी सर्व विभागीय आयुक्त आणि संबंधित अधिकार्‍यांची मुंबईत बैठक बोलावली आहे.