चतारी येथे चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ठिकाणी घरफोडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 10:30 IST2020-07-05T10:29:35+5:302020-07-05T10:30:06+5:30

चोरट्यांनी धुमाकूळ घालून दोन ठिकाणी घरफोडी करून ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

A swarm of thieves at Chatari; Burglary in two places! | चतारी येथे चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ठिकाणी घरफोडी!

चतारी येथे चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ठिकाणी घरफोडी!

लोकमत न्यूज नेटवर्क
खेट्री : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चतारी येथे ३ जुलै रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून दोन ठिकाणी घरफोडी करून ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नंदकिशोर प्रल्हाद मांजरे व दिनकर सहदेव बहुरुपी यांच्या तक्रारीनुसार ते कुटुंबातील सदस्यांसह घरात झोपले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोन मोबाइल व कपाटातील ठेवलेली रोख असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल लंपास करून पसार झाले. तसेच लोखंडी पेट्या उचलून शेतामध्ये नेऊन ठेवलेली कागदपत्रे व साहित्याची नासधूस केली. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक आदिनाथ गाठेकर, पातोंड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास एएसआय मातोंडकरकरीत आहे. गेल्या एक महिनाभरापूर्वी खेट्री, शिरपूर येथे २७ मे रोजीच्या रात्री चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी करून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

Web Title: A swarm of thieves at Chatari; Burglary in two places!