शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'आरबीएसके' अंतर्गत ४२ रुग्णांवर 'टंगटाय'ची शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 15:22 IST

अकोला: राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सोमवारी ४२ बालकांवर टंगटायची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित बालकांवर आठवडाभरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

अकोला: राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सोमवारी ४२ बालकांवर टंगटायची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित बालकांवर आठवडाभरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गत वर्षभरात शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेंतर्गत ६५ विद्यार्थ्यांमध्ये टंगटायची समस्या आढळून आली. प्राथमिक तपासणीनंतर या बालकांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने पहिल्या टप्यात सोमवार २५ फेब्रुवारी रोजी ४२ बालकांवर टंगटायची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. नंदकिशोर सलामपुरिया व डॉ. मयूर अग्रवाल यांनी केली. या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.बी. राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.काय आहे टंगटाय?टंगटाय म्हणजेच जीभ बांधून ठेवणे. ही समस्या मुळात जन्मत:च मुलांमध्ये असते. यामध्ये जीभेच्या खालच्या बाजूचा भाग जाड असल्याने जीभेची योग्य हालचाल होत नाही. जीभेला बांधून ठेवल्याप्रमाणे ही स्थिती असते. त्यामुळे जीभ टाळूपर्यंत पोहोचत नाही. परिणामी त्यांच्या बोलण्याचा उच्चार बोबडा निघतो.पोटाचे विकारही संभावतातज्या मुलांना टंगटायची समस्या आहे, अशांना ग्रहण केलेले अन्न नीट चघळता येत नाही. या प्रक्रियेतून खाद्य पदार्थ योग्य प्रकारे पचनसंस्थेत पोहोचत नसल्याने पोटाच्या विकारांना समोरे जावे लागते.राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत तपासणी अंतर्गत ६५ विद्यार्थी टंगटायने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले. यातील ४२ रुग्णांवर सोमवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित रुग्णांवर आठवडाभरात शस्त्रक्रिया केली जाईल.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य