शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

‘सूर रायझिंग स्टार’मधून चमकले उद्याचे ‘सुपरस्टार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:43 IST

अकोला : आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. आर्थिक, कौटुंबिक, तर कधी व्यासपीठच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्तगुणांना वाव देऊन त्यांच्या कलाकौशल्य प्रतिभेला नवे पंख देण्यासाठी ‘लोकमत समूह’ नेहमीच आघाडीवर असतो. विविध कार्यक्रम,  स्पर्धा, टॅलेंट शो आयोजित करून या ‘उद्या’च्या सुपरस्टार्सना प्रकाशझोतात आणले जाते.

ठळक मुद्दे‘कलर्स -लोकमत समूह’ यांचा उपक्रम, उपस्थित मंत्रमुग्धगेम शोलाही उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. आर्थिक, कौटुंबिक, तर कधी व्यासपीठच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्तगुणांना वाव देऊन त्यांच्या कलाकौशल्य प्रतिभेला नवे पंख देण्यासाठी ‘लोकमत समूह’ नेहमीच आघाडीवर असतो. विविध कार्यक्रम,  स्पर्धा, टॅलेंट शो आयोजित करून या ‘उद्या’च्या सुपरस्टार्सना प्रकाशझोतात आणले जाते. सुरांचे देणे लाभलेल्या प्रतिभावान गायकांना एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी ‘लोकमत आणि कलर्स वाहिनी’ आगळे- वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. ‘सूर  रायझिंग स्टारचे’ असे त्याचे नाव. कलर्स  व लोकमतद्वारे आयोजित ही गायन स्पर्धा रविवारी प्रमिलाताई ओक हॉल  येथे पार पडली. यामध्ये ४ वर्षांपुढील मुले-मुली, स्त्री-पुरुष आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाचा प्रारंभ ‘लोकमत’ चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या  प्रतिमा पूजनाने झाला. यावेळी व्यासपीठावर परीक्षक प्रा.डॉ. किशोर देशमुख, राम पांडे, धनजंय देशमुख आणि प्रमुख पाहुण्या म्हणून दीपाली जस्मतिया उपस्थित होत्या. प्राथमिक फेरीतील निवडक १८ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धकांनी आपल्या गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये ‘ए मेंरे वतन के लोगो’, खेळ मांडला आदी गाण्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे या प्रयत्नांना यंदा साथ मिळाली आहे, ती कलर्स वाहिनीची. मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांची निर्मिती करून छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या घरा-घरांमध्ये कलर्सने  बोलबाला निर्माण केला आहे. शुद्ध, कौटुंबिक, संस्कारक्षम कार्यक्रमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासोबत सामाजिक बांधीलकीचेही अनेक उपक्रम राबविले जातात.

‘रायझिंग स्टार’ विजेते..प्रथम क्रमांक : कल्याणी सावकेद्वितीय क्रमांक : श्रद्धा भंसालीतृतीय क्रमांक : अनिकेत खंडारे

‘रायझिंग स्टार’च्या निमित्ताने कलर्स वाहिनी घेऊन येत आहे. भारतातील पहिल लाइव्ह रिअँलिटी शोचे दुसरे पर्व, ज्याद्वारे मोडल्या जाणार विचारांच्या चौकटी. भाषा, जात, आर्थिक स्थिती, धर्म अशा चौकटींची बंधने झुगारून आपले टॅलेंट जगासमोर आणणार्‍या गायकांना या चौकटी मोडण्यास मदत म्हणून या शोच्या माध्यमातून तुम्ही  देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून लाइव्ह व्होटिंग करू शकता. यामध्ये साथीला आहेत देशातील तीन महारथी परीक्षक, गायक व संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर आणि अभिनेता व गायक दिलजित दोसांज. परंतु, खरे परीक्षक तर कलर्स वाहिनी पाहणारे १३0 कोटी भारतीय असणार आहेत. तर मग या सिझनमध्ये केवळ विचारांच्या चौकटीच नाही मोडल्या जाणार, तर देशातील प्रतिभावान गायकांचे नशीबही बदलणार आहे. कलर्स वाहिनीवर २0 जानेवारीपासून सुरू झालेला असून, दर शनिवार व रविवारी रात्री ९ वाजता प्रकाशित होणार आहे. देशातील एकमेव लाइव्ह सिंगिंग रिअँलिटी शो ‘रायझिंग स्टार’. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरLokmat Eventलोकमत इव्हेंट