सततच्या नापिकीला कंटाळून टिटवा येथील युवा शेतकर्‍याची  आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:29 IST2017-11-06T20:16:11+5:302017-11-07T00:29:51+5:30

पिंजर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला  कंटाळून टिटवा येथील २७ वर्षीय युवा शेतकर्‍याने विष प्राशन  करून आत्महत्या केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी उघडकीस  आली. संतोष शंकरराव अहेर असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. 

Suicides of a young farmer in a piggyrer bored on the continuous napki | सततच्या नापिकीला कंटाळून टिटवा येथील युवा शेतकर्‍याची  आत्महत्या

सततच्या नापिकीला कंटाळून टिटवा येथील युवा शेतकर्‍याची  आत्महत्या

ठळक मुद्देविष प्राशन करून संपविली जीवनयात्रासंतोष शंकरराव अहेर असे मृत शेतकर्‍याचे नाव

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंजर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला  कंटाळून टिटवा येथील २७ वर्षीय युवा शेतकर्‍याने विष प्राशन  करून आत्महत्या केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी उघडकीस  आली. संतोष शंकरराव अहेर असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. 
संतोष अहेर यांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतीत अपेक्षित उ त्पन्न होत नव्हते. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी  २९ ऑक्टोबर रोजी विष प्राशन केले होते. त्यांना तातडीने  अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले  होते. उपचारादरम्यान ५ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या  मागे पत्नी, मुलगी, आई, वडील व आप्त परिवार आहे.

Web Title: Suicides of a young farmer in a piggyrer bored on the continuous napki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.