युवा शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 18:00 IST2019-09-16T17:59:51+5:302019-09-16T18:00:01+5:30
खोलेश्वर उत्तम कानडे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.

युवा शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या
पारद (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून सांगवा मेळ येथील युवा शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. खोलेश्वर उत्तम कानडे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
खालेश्वर कानडे यांचे शेताचे १५ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल होते. त्यांनी पेरणीसाठी को आॅफ सहकारी सोसायटीचे कर्ज होते. यावर्षी सततच्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे या विवंचनेत खोलेश्वर कानडे यांनी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास बिट जमादार उघडे करीत आहेत. (वार्ताहर)