शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 10:50 AM

सासरकडील मंडळींकडून श्वेताचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत हो

मूर्तिजापूर: माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोही येथील २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून बुधवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात माना पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विवाहितेने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. तिला दोन महिन्यांची एक मुलगी आहे.श्वेता सेवने हिने नात्याने मामेभाऊ असणाºया स्वप्निल आंबिलकर याच्यासोबत ६ डिसेंबर २०१६ रोजी न्यायालयात प्रेमविवाह केला होता. काही महिने सुखाचे गेले. लग्नानंतर श्वेता पतीसोबत पुण्याला वास्तव्याला होती. त्यानंतर श्वेता व तिचा पती स्वप्निल हे पोही गावी राहायला आले. दरम्यान, सासरकडील मंडळींकडून श्वेताचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. तिने तशी माहिती तिच्या आईला दिली होती. त्यानंतर सासरच्या मंडळींनी श्वेतास माहेरच्या नातेवाइकांसोबत बोलण्यास मनाई केली. जुलै २०१९ ला तिने आईला फोन करून प्रसूतीसाठी ती पोही येथे येणार असल्याचे सांगितले; परंतु पती व सासरकडील लोकांनी दर्यापूरला माहेरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी श्वेताने मुलीला जन्म दिला. श्वेताचे वडील प्रल्हाद सेवने (रा. साईनगर, दर्यापूर) यांच्या तक्रारीनुसार मूर्तिजापूर पोलिसांनी पती स्वप्निल गोपाल आंबिलकर, सासरा गोपाल तुळशीराम आंबिलकर, सासू प्रमिला आंबिलकर, नणंद रूपाली तायवाडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८, अ ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार संजय खंडारे, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील, नंदकिशोर टिकार, पंजाबराव इंगळे व सहकारी करीत आहे.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाSuicideआत्महत्या