जांभा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 14:50 IST2018-07-23T14:48:37+5:302018-07-23T14:50:58+5:30
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जांभा बु. येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

जांभा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्युज नेटवर्क
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जांभा बु. येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
रमेश पुणार्जी चिकटे (५१. रा. जांभा बु.) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. रमेश चिकटे हे नेहमी प्रमाणे रात्री झोपले होते. सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थे आढळून आले. कुटुंबियांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विजय मगर हे . का. कैलास गवई, लक्ष्मण आंबेकर सह पोलीसांनी धाव घेतली. मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपास करीता मूर्तीजापूर येथील रुग्णालयात पाठवून पोलीस दफ्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास ठाणेदार विजय मगर सह पोलीस करीत आहेत.