सिरसो येथील शेतमजूराची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 02:49 PM2020-03-03T14:49:34+5:302020-03-03T14:49:40+5:30

. संतोष लक्ष्मण उईके(४२) असे मृतकाचे नाव आहे.

Suicide by farm laborer in Sirso | सिरसो येथील शेतमजूराची गळफास घेऊन आत्महत्या

सिरसो येथील शेतमजूराची गळफास घेऊन आत्महत्या

Next

मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो येथील शेतमजूराने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. संतोष लक्ष्मण उईके(४२) असे मृतकाचे नाव आहे.
सिरसो येथील संतोष उईके हे मोलमजुरी करुन आपल्या कुटूंबाचा गाडा चालवित होते. त्यांनी आपल्या घरी कोणी नसताना २ मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. शेतमजूरी करणाऱ्या संतोषच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुली आहेत. विशेष म्हणजे त्यांची मोठी मुलगी अकोला येथील नवोदय विद्यालयात वर्ग ८ मध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या आत्महतेचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (शहर प्रतिनिधी )

Web Title: Suicide by farm laborer in Sirso

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.