शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा - किशोर तिवारी यांची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 12:59 IST

अडकलेली दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

- संतोष येलकरअकोला : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत वाटपाची प्रक्रिया रखडली. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून, खरीप हंगाम तोंडवर आला आहे. त्यानुषंगाने अडकलेली दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.राज्यातील दुष्काळी भागातील ४० लाख शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्र्फत मदतनिधी मंजूर करण्यात आला असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजूर मदतनिधी जिल्हानिहाय वितरित करण्यात आला; परंतु गत मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे राज्यात तालुका स्तरावर दुष्काळी मदतीचे वाटप थांबविण्यात आल्याने बहुतांश दुष्काळग्रस्त शेतकºयांना दुष्काळी मदतीचा लाभ अद्याप मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, खरीप हंगामही तोंडावर आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत अडकलेली दुष्काळी मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २४ मे रोजी केली आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.‘पीएम किसान’ मदतीचाही शेतकऱ्यांना लाभ द्या!केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (पीएम-किसान) दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची रक्कम काही शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यात ६० लाख लाभार्थी शेतकरी असून, सर्व लाभार्थी शेतकºयांच्या खात्यात तीन हप्त्याची सहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे पात्राद्वारे केल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारीFarmerशेतकरीdroughtदुष्काळPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना