शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतले गोंधळवाडी गाव दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 20:22 IST

पातूर- उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी बाळापूर उपविभागातील २०० गावांमधून दत्तक ग्राम म्हणून दत्तक घेतले आहे, त्यामुळे गावात वॉटर कप स्पर्धेच्या कामांना गती आली आहे.

वॉटर कप स्पर्धेनिमित्त श्रमदानाला आले उधाणपातूर : नजीकच्या गोंधळवाडी या माळरानावरील आदिवासी गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची कामे जोरात सुरू असून, तेथील गावकऱ्यांचा उत्साह पाहता सदर गाव उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी बाळापूर उपविभागातील २०० गावांमधून दत्तक ग्राम म्हणून दत्तक घेतले आहे, त्यामुळे गावात वॉटर कप स्पर्धेच्या कामांना गती आली आहे. गोंधळवाडी हे आदिवासी गाव माळरानावर वसलेले असून, या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे बिबे फोडणे व मोलमजुरी करण्याचाच आहे. येथील संपूर्ण शेत जमीन पूर्णत: कोरडवाहू, पाण्याचा प्रश्न बिकट अशी एकंदरीत स्थिती आहे. आजचा दिवस आपला कसा जाईल, या चिंतेत असलेले गावकरी कोरडवाहू शेतीसाठी पाण्याच्या बिकट प्रश्न असूनही ते जिद्द व मेहनतीने आयुष्य जगत आहेत; पण आज स्थितीत त्यांना ही परिस्थिती बदलायची आहे. अशातच त्यांना सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची साथ मिळाली. गोंधळवाडीवासीयांनी श्रमदानाचा महापूर आणला होता. गावात एक व्यक्तीसुद्धा घरामध्ये दिसत नव्हता. संपूर्ण गाव हे श्रमदानासाठी आले होते. त्यांना उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व तालुका कृषी अधिकारी मकासरे यांची साथ मिळाली. त्यांनी लहान मुलांपासून ते वृद्ध आजोबा, आजी यांची आस्थापूर्वक विचारपूस करून त्यांच्यासोबत श्रमदान केले. खडसे यांनी गोंधळवाडी येथील गावकऱ्यांची मेहनत व उत्साह पाहून बाळापूर विभागातील २०० गावांमधून सदर गाव दत्तक घेतले. तातडीने गावात कॅम्प लावून व स्वत: गावात हजर राहून सर्वांना जातीचे प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली. इतर समस्या लवकरात लवकर सोडविण्याचीही गावकऱ्यांना ग्वाही दिली, तसेच मकासरे यांनी जलयुक्त शिवार योजनेमधून पूर्णपणे मदत करण्याचे आश्वासन दिले. सद्यस्थितीत जवळपास ३०० ते ४०० गावकरी, सरपंच, पाणी फाउंडेशनचे तालुका स्वयंसेवक नानवट, नवनाथ, ग्रामसचिव घोडके, कृषी सहायक अंधारे, महसूल विभागाचे नाईक, तलाठी खुर्सडे हे श्रमदान करीत आहेत. २५ एप्रिल रोजी श्रमदानातून कॅम्परमेन्ट बन्डिंग, सीसीटी बांध व वृक्षारोपणाचे खड्डे करण्यात आले.