शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

दहावी नापास विद्यार्थ्यांंनाही आता ‘आयटीआय’ प्रवेश

By admin | Updated: June 15, 2015 01:47 IST

नोंदणीसाठी २४ जून अंतिम दिवस

अकोला : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून सुरू झाली असून, यंदाच्या नवीन शैक्षणिक सत्रात दहावी नापास विद्यार्थ्यांंनादेखील आयटीआयमध्ये प्रवेश मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांंचे मनोधैर्य वाढणार आहे. नुकताच दहावीचा निकाल लागला असून, अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आता विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम निवडण्यात गुंतलेले आहेत. दुसरीकडे नापास विद्यार्थ्यांंच्या मोठय़ा गटामध्ये निराशा पसरलेली आहे. नापास विद्यार्थ्यांंना मुक्त विद्यापीठाचा पर्याय उपलब्ध असला तरी फारसे विद्यार्थी याकडे वळत नाही. परिणामी यातील काही विद्यार्थी पुन्हा परीक्षेच्या तयारीला लागले असले तरी, अनेकांनी पुढील शिक्षणाच्या आशा सोडून खासगी दुकानांमध्ये काम करण्याचा निर्धार केल्याचे वास्तव आहे. परंतु, यंदा नवीन शैक्षणिक सत्रासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काही अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्हतेत बदल करण्यात आल्याने दहावी नापास विद्यार्थ्यांंंंंंनादेखील आयटीआयमध्ये प्रवेश मिळणार आहे. या अभ्यासक्रमासाठी मागील वर्षीपर्यंंंंंंत इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक होते, परंतु शासनाच्या नवीन निर्णयानुसार आठवी उत्तीर्ण प्रवेशाची अट काढण्यात आली असून, आता दहावी नापास विद्यार्थ्यांंना प्रवेश मिळणार आहे. दहावी नापास विद्यार्थ्यांंनाही आता आयटीआयचा पर्याय उपलब्ध झाल्याने अनेक विद्यार्थी शैक्षणिक नुकसानापासून बचावल्या जाणार आहेत. व्यावसायिक शिक्षणाचे कौशल्य अंगी असल्यामुळे या विद्यार्थ्यांंना स्वत:च्या व्यवसायातून आपले करिअर घडविता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवीन आशा पल्लवित झाल्या आहेत.