शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंची मुजोरी

By admin | Updated: October 19, 2014 01:13 IST

अकोला जिल्हा रूग्णालयातील प्रकार, दिवसभर रुग्ण ताटकळत, प्रशासनाचाही वचक नाही.

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुजोर विद्यार्थ्यांंनी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला न जुमानता शुक्रवारपासून संप पुकारल्याने येथे उपचारासाठी आलेल्या व दाखल असलेल्या रुग्णांना शनिवारी उपचाराविनाच ताटकळत राहावे लागले. वाडेगाव येथील एका युवकाचा प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर, पोलिस व नातेवाइकांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात पोलिसांवर कारवाई करण्यासाठी डॉक्टरांनी हा संप पुकारला असून, रुग्णांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. वाडेगाव येथील रहिवासी अवी सोनोने याने शुक्रवारी सकाळी विष प्राषण केले. अवीला तातडीने सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयात भरती केले तेव्हा अवी सुस्थितीत होता. भरती केल्यानंतर अवीला डॉक्टरांनी सलाईन लावले; मात्र त्यानंतर कोणतेही उपचार केले नाही. अवीच्या नातलगांनी डॉक्टरांना उपचार करण्याची विनंती वारंवार केली; मात्र डॉक्टर लक्ष देत नसल्याचे पाहून, नातलग चिडले. याच मुद्यावर त्यांच्यात वादही झाले; परंतु वादविवादापेक्षा उपचार महत्त्वाचे असल्याने नातलगांनी अवीला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. तेथील डॉक्टरांनी अवीला मृत घोषित केल्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात आणला. त्यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांंनी अवीचा मृतदेह असलेले वाहन रुग्णालयात अडविले. त्यामुळे मृताचे नातेवाईक आणि डॉक्टर तसेच विद्यार्थ्यांंमध्ये पुन्हा वाद झाला. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी सवरेपचार रुग्णालय गाठून डॉक्टरांना समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र डॉक्टरांनी पोलिसांशीही वाद घातला. पोलिसांनी शवविच्छेदन करण्याची विनंती डॉक्टरांना केली; तरीही डॉक्टरांसह विद्यार्थ्यांंनी आधी लाठीचार्ज करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई करा आणि मगच शवविच्छेदन करू, अशी मागणी करीत संप पुकारला. शुक्रवारी दुपारपासून सुरू केलेला संप शनिवारीही मागे न घेता या मुजोर विद्यार्थ्यांंंनी रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रताप केला. रुग्णांचे प्राण वाचविणार्‍या डॉक्टरच्या अशा वागणुकीमुळे डॉक्टरी पेशाला कलंक लावण्यात येत असल्याचा आरोप रुग्णांकडून करण्यात येत आहे. रुग्णालयात रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचे पाहून अधिष्ठाता डॉ. राठोड यांनी विद्यार्थ्यांंना संप मागे घेण्याचे सांगितले; मात्र विद्यार्थ्यांंंनी त्यांचा आदेश धुडकावून लावला. शनिवारीही संप कायम ठेवल्याने रुग्णालयातील शेकडो रुग्णांचे प्रचंड हाल सुरू होते. एकाही रुग्णावर उपचार होत नसल्याने या ठिकाणी रुग्णांची प्रचंड गर्दी झाली होती; मात्र प्रशासनाने कुठलीही पर्यायी व्यवस्था न केल्याने रुग्णांनी संताप व्यक्त केला.