‘जेआयपीएमईआर’ परीक्षेत अकोल्याचे विद्यार्थी चमकले!
By Admin | Updated: June 11, 2017 02:41 IST2017-06-11T02:41:11+5:302017-06-11T02:41:11+5:30
पाच विद्यार्थी उत्तीर्ण; दोघांचा प्रवेश निश्चित

‘जेआयपीएमईआर’ परीक्षेत अकोल्याचे विद्यार्थी चमकले!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : उत्कृष्ट डॉक्टर घडविणारे जागतिक दर्जाचे केंद्र अशी ओळख असलेल्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पाँडेचेरी येथील ह्यजवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँण्ड रिसर्चह्ण (जेआयपीएमईआर) या संस्थेच्या प्रवेश परीक्षेत अकोल्यातील पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशपातळीवर ४ जून रोजी ७३ शहरांमधील ३३९ केंद्रांवर घेण्यात आलेल्या या परीक्षेत देशभरातून १ लाख ८९ हजार ६६३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
शुक्रवार, ९ जून रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, अकोल्यातील पाच विद्यार्थी यामध्ये चांगल्या गुणाणुक्रमाने उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा मुलगा शर्व पाटील हा ५६५ रँक घेऊन उत्तीर्ण झाला आहे.वैद्यकशास्त्रातील संशोधनात ह्यजेआयपीएमईआरह्ण या केंद्राचे नाव जगभरात मोठय़ा आदराने घेतले जाते. अत्यंत उच्च दर्जाचे शिक्षण व वार्षिक केवळ २0,४७0 रुपये एवढे माफक शुल्क या दोन कारणांमुळे या केंद्रात प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी मोठय़ा संख्येने विद्यार्थी परीक्षा देतात. यामधून मात्र २00 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येतो. यावर्षी एकूण १ लाख ८९ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये अकोल्याचे विक्रम काटे (रँक -१३७), यशपाल पाकळ, (रँक -१६0), आकाश मंत्री (रँक -३५२), शर्व पाटील (रँक -५६५) आणि गौरी भन्साली (रँक -७३१) हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी विक्रम काटे हा ओबीसीमध्ये देशातून २0 वा आला असून, यशपाल पाकळ हा २६ व्या क्रमांकावर आहे.
केवळ २00 विद्यार्थ्यांची होणार निवड!
च्ह्यजेआयपीएमईआरह्णच्या प्रवेश परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले, तरी गुणाणुक्रम पहिल्या २00 जणांनाच या जागतिक दर्जाच्या संस्थेत प्रवेश मिळणार आहे. यामध्ये अकोल्याचे विक्रम काटे (रँक -१३७) व यशपाल पाकळ (रँक -१६0) या दोघांचा प्रवेश निश्चित समजल्या जात आहे.
पाच विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची पहिलीच वेळ
च्वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या ह्यजेआयपीएमईआरह्णची प्रवेश परीक्षा ही अत्यंत कठीण असते. निकालाची टक्केवारी केवळ 0.१२ एवढी कमी असते. दोन वर्षांपूर्वी अकोल्यातील सारांश शैलेश वखारिया याने ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. यावर्षी अकोल्याच्या पाच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण करून ह्यजेआयपीएमईआरह्णचे दार ठोठावले आहे.