शिकवणी वर्गाच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थीनीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 18:22 IST2019-07-30T18:22:08+5:302019-07-30T18:22:15+5:30
अकोला: अकरावीतील विद्यार्थीनीने शिकवणी वर्गाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी अाठ वाजता दरम्यान घडली.

शिकवणी वर्गाच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थीनीचा आत्महत्येचा प्रयत्न
अकोला: अकरावीतील विद्यार्थीनीने शिकवणी वर्गाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी अाठ वाजता दरम्यान घडली. हा प्रकार स्थानिक युवकांच्या लक्षात अाल्यानंतर जखमी विद्यार्थिनीला तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. सध्या विद्यार्थिनीवर उपचार सुरू असून, प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
न्यू तोष्णीवाल लेआऊट भागातील हाँरीझन कोचिंग क्लासेस येथील अकरावीतील विद्यार्थिनीने याच शिकवणी वर्गाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांच्या ही घटना निदर्शनास येताच त्यांनी जखमी मुलीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थिनीवर उपचार सुरू अाहेत. जखमी विद्यार्थिनी ही शहरातीलच कृषी नगर भागातील रहिवासी आहे. दरम्यान, विद्यार्थिनीचे आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असून, या प्रकरणी पुढील सिव्हिल लाईन्स पोलिस करीत अाहेत.