शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

टिप्परची धडक; चिमुकला विद्यार्थी ठार

By admin | Updated: August 23, 2014 02:04 IST

आजोबासोबत सायकलवर शिकवणीला जाताना घडला अपघात; अकोल्यातील उमरी नाक्यावरील घटना

अकोला : भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेमध्ये खामगाव तालुक्यातील माटरगाव येथील रहिवासी असलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास उमरी नाक्यावर घडली. आजोबासोबत सायकलवर शिकवणी वर्गासाठी जात असताना हा अपघात घडला. अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी टिप्परवर दगडफेक केली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून, चालक रमेश सुखदेव जाधव याला अटक केली. लहान उमरीतील महादेव मंदिराजवळ राहणारे गणेश केशवराव देशमुख यांच्यासोबत जयेश मंगेश देशमुख (६) हा सायकलवर केला प्लॉटमधील स्वरूपा भगत यांच्याकडे शिकवणी वर्गासाठी जात होता. त्यांची सायकल उमरी नाक्यावरील श्रीहरी मार्केटजवळ आली असता, समोरून भरधाव येणार्‍या एमएच ३0 एल ४८२२ क्रमांकाचा टिप्परला पाहून गणेश देशमुख यांनी सायकल बाजूला घेण्याचा प्रयत्न केला; परंतु टिप्परने सायकलला धडक दिल्याने गणेश देशमुख व चिमुकला जयेश हे सायकलवरून खाली कोसळले आणि जयेश हा टिप्परच्या मागील चाकात आल्याने, त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यात तो जागीच मरण पावला. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी टिप्परवर दगडफेक करून टिप्परच्या काचा फोडल्या. सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि टिप्पर जप्त करून चालकाला अटक केली. *आणखी एक विद्यार्थी जखमीगणेश गंगागिरी यांच्या मालकीच्या एमएच 30-एए-3033 क्रमांकाच्या ट्रकने दुपारी १२ वाजताच्या सुमारास सम्राट बार समोर दर्शन वासुदेव गवई (१५) याला धडक दिली. यात दर्शन गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात भरती केले. त्यानंतर गंगागिरी यांच्याच मालकीच्या दुसर्‍या ट्रकने चिमुकल्या जयेशचा बळी घेतला.