शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

सरकी ढेपची साठवणूक; भाव गेले चार हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 2:02 PM

सरकी ढेपीचे भाववाढ आटोक्यात येत नसल्याने मागील दीड महिन्याआधी पशुपालकांनी दुधाच्या दरात वाढ केली.

- संजय खांडेकरअकोला : सरकी ढेपेचा साठवणूक करण्यात आल्याने ढेपेचे प्रतिक्ंिवटल दर ४००० रुपयांवर पोहोचले असून, पशुपालक आणि दूध विक्रेते पुन्हा अडचणीत सापडले आहेत.विदर्भ आणि मराठवाड्यातील सरकी ढेपीची मागणी संपूर्ण देशातून असते. देशभरातून असलेली मागणी लक्षात घेता राष्ट्रीय स्तरावरील सटोडियांनी सरकी ढेपीची साठवणूक सुरू केली. त्यामुळे जुलै २०१९ पासून सरकी ढेपीचे भाव वाढत आहे. सातत्याने वाढत असलेल्या सरकी ढेपीच्या भावामुळे पशुपालक कमालीचे त्रासले आहे. सरकी ढेपीचे भाववाढ आटोक्यात येत नसल्याने मागील दीड महिन्याआधी पशुपालकांनी दुधाच्या दरात वाढ केली; मात्र सरकी ढेपीचे भाव पुन्हा वरचढ झाले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सरकी ढेपीचे भाव चार हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे पशुपालक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. दूध विक्री परवडत नसल्याने आता पशुपालक पुन्हा भाववाढ करण्याच्या मन:स्थितीत आहेत. पॅकिंग दुधाचे भाव मात्र स्थिरसरकी ढेपीचे भाव सातत्याने वाढत असल्याने पशुपालकांनी दुधाच्या भावात वाढ केली; मात्र विविध कंपन्यांकडून येणाºया पॅकिंग दुधाचे भाव मात्र स्थिर आहेत. अनेकांनी पशुपालकांकडील दूध बंद करून पॅकिंगचे दूध सुरू केले आहे. ‘एनसीडीईएक्स’वर मोठी साठवणूकसरकी ढेपीची साठवणूक सटोडियांसह एनसीडीईएक्सवर (नॅशनल कमोडिटी अ‍ॅण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमि.)देखील होत आहे. विशेष म्हणजे, अलीकडचे भाव ३९०० रुपये प्रतिक्विंटल अन् डिसेंबर-जानेवारीचे भाव २१०० च्या घरात दाखविले जात आहेत. एनसीडीईएक्सवर १८ सप्टेंबरपर्यंत अकोल्यात ३४७ टन आणि कडी येथे ९९० टन सरकी ढेपीची साठवण अधिकृतपणे दाखविली जात आहे. याशिवाय स्थानिक व्यापारी आणि इतर सटोडियांची साठवणूक वेगळी आहे. दुधाळ जनावरांसाठी सरकी ढेप संजीवनीविदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचा मोठा पेरा आहे. त्यामुळे कापूस प्रक्रिया उद्योग या परिसरात विकसित झालेत. जिनिंग फॅक्टरी, सरकी तेल, काळा साबण आणि चोथ्यापासून सरकी ढेपीची निर्मिती होते. दुधाळ जनावरांना चाºयासोबत सरकी ढेपीचा काला दिल्यास दुधाळ जनावरांच्या दुधात मोठ्या प्रमाणात वाढ होते. याचे अनुभव पशुपालकांना आल्याने देशभरातील सरकी ढेपीला मागणी आहे. त्यामुळे सटोडिये सरकी ढेपीची साठवणूक करतात.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसायMarketबाजार