शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबता थांबेना!

By admin | Updated: May 11, 2014 22:03 IST

जिल्हाधिकार्‍यांचे निर्देशही पायदळी

वाशिम : संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी नगर परिषद प्रशासनाला सर्व दुकानदारांच्याकडून ४0 मायक्रॉनहून कमी जाडीच्या पिशव्यांचा साठा जप्त करावा, असे निर्देश आठ दिवसांपूर्वी दिले होते. मात्र, प्लास्टिक पिशव्यांच्या साठय़ांचा शोध घेण्याचा मुहुर्त जिल्ह्यातील नगर परिषद प्रशासनाला अजूनही सापडला नसल्याचे दिसून येते. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यासाठी, नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची एक खास बैठक बोलाविली होती. या बैठकीत नगर परिषद प्रशासनाला विशेष सूचनाही दिल्या होत्या. जिल्हय़ातील सर्व नगर परिषदांनी आपल्या हद्दीतील धोकादायक इमारती व अतिक्रमीत इमारतीचा सर्व्हे करुन संबंधित मालकांना नोटीस देवून कारवाई करावी, इमारती धोकादायक ठरविण्याआधी त्यांची योग्य प्रकारे तपासणी करावी, शहरातील नाले, ओढे साफ करुन त्यांच्यावरील अतिक्रमणे दुर करावीत, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबून दुर्घटना होण्याची शक्यता असते त्यामुळे नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व दुकानदारांच्याकडून ४0 मायक्रॉनहून कमी जाडीच्या पिशव्यांचा साठा जप्त करावा, तसेच त्याचा वापर करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश कुलकर्णी यांनी दिले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचा एक भाग म्हणून नगर परिषद प्रशासनाने तातडीने नियोजन करणे अपेक्षीत होते. मात्र, नाले सफाई, प्लास्टिक पिशव्यांचे साठे, धोकादायक इमारतीबाबत जिल्ह्यातील चारही नगर परिषदेचे प्रशासन अजूनही फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. जिल्हाधिकार्‍यांनी सर्व विभाग प्रमुखांना आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा अत्यंत कडक असल्याची जाणीवही करून दिलेली आहे. या कायद्यानुसार प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा व आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विभागानी याची पूर्तता करावी. आपत्ती ही केवळ नैसर्गिक नसते तर ती मानव निर्मितही असते त्यासाठी काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट बजावले. कार्बाईड व तत्सम रासायनिक प्रक्रियेने पिकविलेल्या फळांची विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले. मात्र, वाशिम शहरात रासायनिक प्रक्रियेने पिकविलेल्या फळांची सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या-त्या यंत्रणेवर आहे. मात्र, अंमलबजावणी होताना दिसत नाही.