अकोट फैलातील शंकर नगरात दोन गटात तुफान दगडफेक; तीन ते चार गाड्यांची तोडफोड

By नितिन गव्हाळे | Published: May 3, 2023 05:44 AM2023-05-03T05:44:03+5:302023-05-03T05:44:15+5:30

परिसरात तणावाचे वातावरण, गेल्या दोन दिवसांपासून येथील दोन्ही गटात शुल्लक कारणावरून वाद सुरू होते.  

Stone pelting storm in two groups in Shankar Nagar in Akot Fail; Vandalism of three to four cars | अकोट फैलातील शंकर नगरात दोन गटात तुफान दगडफेक; तीन ते चार गाड्यांची तोडफोड

अकोट फैलातील शंकर नगरात दोन गटात तुफान दगडफेक; तीन ते चार गाड्यांची तोडफोड

googlenewsNext

अकोला:  शहरातील अकोट फाईल भागातील शंकर नगरात  दोन गटात तुफान दगडफेक आणि हाणामारी झाली झाली असून चार ते पाच मोटरसायकल यांची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी आठही पोलीस ठाण्यांमधून कुमक मागवण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून येथील दोन्ही गटात शुल्लक कारणावरून वाद सुरू होते.  याचे रूपांतर मंगळवारी रात्री अकरा वाजता च्या सुमारास  दगडफेक आणि हाणामारीत झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आकोट फाइलवर शंकर नगर भागात कडे कोर्ट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दगडफेकीत अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळवलं असून आरोपींची धरपकड सुरू सुरू असून पोलिसांनी शंकर नगर भागातील चार ते पाच जणांना ताब्यात घेतले आहेत तर दुसऱ्या गटातील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Stone pelting storm in two groups in Shankar Nagar in Akot Fail; Vandalism of three to four cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.