शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

आमदारांची प्रतिष्ठा; इच्छुकांची ‘सेमी फायनल’! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 12:12 IST

लोकसभा निवडणूक ही उमेदवारांसह विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांसाठी सेमी फायनल ठरणार आहे, तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांसाठी आपल्या पक्षाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

- राजेश शेगोकार

 अकोला: पाच राज्यांतील निवडणूक निकालांनी काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षेला पुन्हा सत्तेचे घुमारे फुटले होते, तर भाजपा-शिवसेना सावध झाली होती. संपूर्ण राज्यासह देशभरात विरोधक तगडे आव्हान उभे करतील, असे चित्र असताना लोकसभा निवडणुकीच्या जागा व उमेदवारी वाटपावरून काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस खिळखिळी झाली, तर दुसरीकडे झाले गेले विसरून भाजपा-सेनेने युती केली असली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विधानसभेचे वेध असल्याने युती मनापासून एकत्र नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. या पृष्ठभूमीवर लोकसभा निवडणूक ही उमेदवारांसह विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांसाठी सेमी फायनल ठरणार आहे, तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांसाठी आपल्या पक्षाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते. यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत भाजपाचे चार, काँगे्रस व भारिप-बमसं प्रत्येकी एक असा विजय मिळाला आहे. अकोला जिल्ह्याचा विचार केला, तर पाचपैकी चार मतदारसंघ भाजपाकडे असून, भारिपकडे असलेल्या बाळापूर मतदारसंघात अवघ्या सहा हजार मतांनी भाजपाचा पराभव झाला आहे. या निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने मारलेली मुसंडी इतर पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरली आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही कात्रजचा घाट दाखवित भाजपाने जिल्हा परिषदेचा अपवाद वगळता जवळपास सर्वच सत्ताकेंद्रांवर ताबा मिळविला आहे. आता युती अन् आघाडी एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या निवडणुकीमध्ये असलेले उमेदवार याही निवडणुकीत कायम आहेत, त्यामुळे आपापल्या पक्षाच्या या उमेदवारांना २०१४ मध्ये मिळालेली मते कायम ठेवत आघाडी देऊन प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे आव्हान विद्यमान आमदारांवर आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांनाही आपल्या पक्षाचे मतदान वाढवून विधानसभेची तयारी करण्याची संधी आहे.

बाळापूरचे आमदार बुलडाण्यात अकोल्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार व वंचित बहुजन आघाडीचे नेते बळीराम सिरस्कार हे बुलडाण्यात उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात वंचितच्या प्रचाराची आघाडी स्थानिक नेत्यांकडे सोपविली आहे. ते बुलडाण्यात असले तरी गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी केलेल्या कामाची पावती  अ‍ॅड. आंबेडकर यांना या मतदारसंघातील मतदार किती देतात, यावर सिरस्कारांची प्रतिष्ठा अवलंबून आहे.  लोकसभेचा इम्पॅक्ट विधानसभेवर लोकसभा निवडणूक निकालाचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर निश्चीतच होणार आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्ष आणि उमेदवार याबाबत मतदारांचे स्वतंत्र मत असले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांना आपल्या मतदारांसोबत संपर्क करीत प्रचाराचा एक राऊंड पूर्ण करण्याची संधी आहे. पक्षाचे मतदान कायम राहील, ते दुसरीकडे वळणार नाही,   याकडे इच्छुकांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक