शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

उपाहार करण्यासाठी चालक-वाहकाने एसटी बस तासभर थांबविली; प्रवाशांसह आजारी महिला ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 4:28 PM

बोरगाव वैराळे (जि. अकोला): अकोला येथून बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे व धामना येथे जाणारी बस चालक व वाहक यांनी कर्तव्यावर असताना हातरुण येथे एका व्यक्तीच्या घरी उपाहार करण्यासाठी चक्क तासभर थांबवून ठेवल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवार, २३ जून रोजी घडला.

ठळक मुद्दे अकोला येथून सुटणारी एसटी बस वेळेवर सुटल्यानंतर ती हातरुण येथे सकाळी ८ वाजता पोहचली. हातरुण - बोरगाव वैराळे मार्गावरील हातरुण येथील एका व्यक्तीने एस टी क्रमांक एम एच ४०-९३२६ ला थांबवून चालक व वाहकाला उपाहार करण्यासाठी आपल्या घरी बोलावले.सकाळी आठ वाजता गेलेले चालक व वाहक तब्बल तासाभराने सकाळी नऊ वाजता परत आल्यानंतर बस बोरगाव वैराळे व धामनाकडे मार्गस्थ झाली.

बोरगाव वैराळे (जि. अकोला): अकोला येथून बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे व धामना येथे जाणारी बस चालक व वाहक यांनी कर्तव्यावर असताना हातरुण येथे एका व्यक्तीच्या घरी उपाहार करण्यासाठी चक्क तासभर थांबवून ठेवल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवार, २३ जून रोजी घडला. चालक व वाहकाच्या मनमानीमुळे धामना, बोरगाव वैराळे येथे जाणारे बसमधील प्रवासी व अकोला येथे जाण्यासाठी वाट पाहत असलेल्या हातरुण येथील एका आजारी महिलेला ताटकळत बसावे लागले.अकोला- निमकर्दा - हातरुण - बोरगाव वैराळे - धामणा ही सकाळी ७ वाजता अकोला येथून सुटणारी एसटी बस वेळेवर सुटल्यानंतर ती हातरुण येथे सकाळी ८ वाजता पोहचली. सदर बस धामनाकडे जाण्यास निघाली असता हातरुण - बोरगाव वैराळे मार्गावरील हातरुण येथील एका व्यक्तीने एस टी क्रमांक एम एच ४०-९३२६ ला थांबवून चालक व वाहकाला उपाहार करण्यासाठी आपल्या घरी बोलावले. बसचे चालक व वाहक हे दोघेही कर्तव्यावर असल्याचे भान न ठेवता चक्क बस रस्त्यावर थांबवून त्या व्यक्तीच्या घरी उपाहार करण्यासाठी गेले. यावेळी बसमध्ये धामना व बोरगाव वैराळे येथे जाणारे आठ ते दहा प्रवासी होते. सकाळी आठ वाजता गेलेले चालक व वाहक तब्बल तासाभराने सकाळी नऊ वाजता परत आल्यानंतर बस बोरगाव वैराळे व धामनाकडे मार्गस्थ झाली. तोपर्यंत बसमधील प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. सदर बस धामना येथून परत हातरुण मार्गे परत अकोला येथे जाते. सकाळी या बसशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे ती परत येईपर्यंत हातरुण येथील प्रवासीही बसची वाट पाहत ताटकळत होते. यामध्ये हातरुण येथील हेलगे कुटुंबातील आजारी महिलेलाही प्रवासी निवाऱ्यावर ताटकळत बसावे लागले. आपले नेमून दिलेल्या कामात दिरंगाई करणाº्या वाहक व चालकावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.अकोला-बोरगाव वैराळे-धामणा बस घेऊन जाणाऱ्या चालक व वाहकाने आपल्या कामात दिरंगाई करीत वैयक्तिक कामासाठी प्रवाशांना ताटकळत ठेवल्याचा प्रकार चुकीचा आहे.याबाबत माहिती घेऊन संबंधित वाहक व चालकावर कारवाई करण्यात येईल. - आर. डी. येवले, आगार व्यवस्थापक, अकोला आगार क्र. २, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाstate transportराज्य परीवहन महामंडळ