एसटी बसची लक्झरी बसला धडक; चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 17:53 IST2019-04-03T17:53:44+5:302019-04-03T17:53:53+5:30
पातूर: पातूर-अकोला राज्य मार्गावर परिवहन महामंडळाच्या भरधाव एसटी बसगाडीने लक्झरी बसला मागाहून धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

एसटी बसची लक्झरी बसला धडक; चार जखमी
पातूर: पातूर-अकोला राज्य मार्गावर परिवहन महामंडळाच्या भरधाव एसटी बसगाडीने लक्झरी बसला मागाहून धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात लक्झरी चालकासह बसमधील तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. या प्रकरणात पातूर पोलिसांनी एसटी बस चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पातूर रोडवरील कापशी पेट्रोल पंपाजवळ एमएच ४0 वाय-५७४३ क्रमाकांच्या भरधाव एसटी बसगाडीने एमएच ३२-क्यु-२0६८ क्रमांकाच्या खासगी लक्झरी बसला मागाहून जोरदार धडक दिली. यात लक्झरी बसचालक अरूण मलैया चाफेकर(रा. जिरा बावडी खदान, अकोला) याच्यासह लक्झरी बसगाडीतील तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. या जखमी प्रवाशांवर पातूर येथील रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. अपघातामध्ये एसटी बसगाडीची समोरील काच फुटली आहे. तसेच लक्झरी बसगाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. लक्झरी बसचालक अरूण चाफेकर याच्या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी एसटी बसचालकाविरूद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ४३ व मोटारवाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)