शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

विशेष पोलीस महानिरीक्षकांनी जाणल्या कर्मचार्‍यांच्या व्यथा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 2:07 AM

अकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे हे वार्षिक निरीक्षणासाठी गुरुवारपासून अकोला दौर्‍यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी पोलीस मुख्यालयातील मैदानावर आयोजित दरबारामध्ये जिल्हय़ातील पोलीस कर्मचार्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि पोलीस अधिकार्‍यांच्या शानदार कवायतीचे निरीक्षण केले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील उपस्थित होते. 

ठळक मुद्देवार्षिक निरीक्षण पोलीस अधिकार्‍यांची शानदार कवायत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे हे वार्षिक निरीक्षणासाठी गुरुवारपासून अकोला दौर्‍यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी पोलीस मुख्यालयातील मैदानावर आयोजित दरबारामध्ये जिल्हय़ातील पोलीस कर्मचार्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि पोलीस अधिकार्‍यांच्या शानदार कवायतीचे निरीक्षण केले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील उपस्थित होते. जिल्हय़ातील पोलीस ठाण्यांचे वार्षिक निरीक्षण करण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे गुरुवारपासून अकोल्यात आले आहेत. गुरुवारी जिल्हय़ातील सर्वच पोलीस निरीक्षकांची त्यांनी बैठक बोलावून, त्यांच्याकडून गुन्हय़ांचा आढावा घेतला. दुपारी पोलीस मुख्यालय मैदानावरील जनता दरबारात त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा योजना राबविण्यासोबतच त्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, यासाठी योजना सुरू करण्याची विशेष पोलीस महानिरीक्षक वाकडे यांच्याकडे विनंती केली. पोलीस कर्मचार्‍यांनी केलेली विनंती विशेष पोलीस महानिरीक्षक वाकडे यांनी मान्य करून, जिल्हय़ात पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबासाठी आरोग्यविषयक योजना करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे केल्या. तसेच अनेक पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना काम करताना येणार्‍या अडचणीसुद्धा त्यांच्यासमोर मांडल्या.  विशेष पोलीस महानिरीक्षक वाकडे यांच्या जनता दरबारामध्ये जिल्हय़ातील शेकडो पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. 

पोलीस लॉनसाठी कर्मचार्‍यांना सवलत द्या!जनता दरबारादरम्यान काही पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी अल्प दरामध्ये पोलीस लॉन मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.  मुला-मुलींच्या लग्नासाठी लाख रुपये भाडे द्यावे लागते. पोलीस कर्मचार्‍यांना तरी त्यासाठी सवलत देण्यात यावी, अशी मागणी पोलीस कर्मचार्‍यांनी केली. पोलीस कर्मचार्‍यांची भावना लक्षात घेता, विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे यांनी, पोलीस कर्मचार्‍यांना लग्नसमारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पोलीस लॉन सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना केली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरPoliceपोलिस