शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या शेतकऱ्यांकडून अकोल्यातून सोयाबीन बियाणांची खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 11:16 IST

Agriculture Sector : महाबीजचे बियाणे संपल्याचे फलक लागल्याने कोणाकडे घरचे सोयाबीन बियाणे आहे का? अशी माहिती शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे.

- सागर कुटे

अकोला : यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवत आहे. महाबीजचे बियाणे संपल्याचे फलक लागल्याने कोणाकडे घरचे सोयाबीन बियाणे आहे का? अशी माहिती शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ४ हजार क्विंटल घरचे सोयाबीन बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. यातील काही बियाणांची विक्री झाली आहे. तुटवड्याची स्थिती वाशिम जिल्ह्यातही आहे. त्यामुळे तेथील शेतकरीअकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून घरचे बियाणे खरेदी करत आहेत.गेल्यावर्षी सोयाबीन बियाणांच्या उगवणशक्तीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अतिपावसाने सोयाबीन पीकही खराब झाले होते. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन राखून ठेवण्याचे आवाहन केले होते; परंतु दर चांगले असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. तरी दीड लाख शेतकऱ्यांकडे बियाणे शिल्लक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे होते. यंदा खासगी कंपनीच्या सोयाबीन बियाणांचे दर वाढल्याने महाबीजकडून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती; मात्र महाबीजनेही निराशा केली. जिल्ह्याला केवळ ११ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा केल्याने बियाणांसाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. आता तेही बियाणे शिल्लक नसून शेतकऱ्यांकडे घरचेही बियाणे किती? हा प्रश्न पडला आहे. कृषी विभागाने ४०१९ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी शिल्लक असल्याचे सांगितले व काही बियाणे इतर शेतकऱ्यांना विकल्याचेही सांगण्यात आले. यामधील बियाणे आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगलीच वाताहात होण्याची शक्यता आहे.

 

शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी असलेले बियाणे

४,०१९ क्विंटल

किती शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी बियाणे

२१८

सर्वाधिक बियाणे कोणत्या तालुक्यात

बार्शीटाकळी २,४८१ क्विंटल

घरच्या बियाणांवर व्यापाऱ्यांचा डोळा!

कृषी सेवा केंद्रांवर मिळणाऱ्या खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग आता घरच्या बियाणांकडे वळला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे असलेल्या घरच्या बियाणांकडे आता व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. हे बियाणे खरेदी करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाच जादा दरात विकण्याचा घाट घालण्यात येत आहे.

 

महागडे बियाणे खरेदीशिवाय पर्याय नाही!

घरचे विक्रीसाठी असलेले बहुतांश बियाणे विक्री झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता खासगी कंपनीचे महागडे बियाणे खरेदी केल्याशिवाय पर्याय उरला नाही. सद्यस्थितीत खासगी कंपनीचे बियाणे ३३००-३५०० रुपये दराने मिळत आहे.

बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडूनही खरेदी

अकोला जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांकडून वाशिम सोबत बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन बियाणे विकत घेतले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 

इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील सोयाबीन बियाणे विकत घेतल्या जात आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या घरच्या सोयाबीन बियाण्यांचा लाभ घ्यावा.

- डॉ.कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :AkolaअकोलाwashimवाशिमFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र