शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

इराण-इराकमधून मागणी बंद; सोयाबीनचे भाव चारशे रुपयांनी घसरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 3:27 PM

फेब्रुवारीपर्यंत इराण-इराक मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी भारताकडून करीत होते; मात्र २६ फेब्रुवारीनंतर हा तणाव अधिक वाढला. त्यामुळे सोयाबीनची खरेदी तूर्त थांबली आहे. सोयाबीनचे भाव प्रती क्विटंल चारशे रुपयांनी गडगडले आहे.

- संजय खांडेकरअकोला:भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे इराण-इराकने भारतातून येणाऱ्या सोयाबीनवर प्रतिबंध घातला आहे. फेब्रुवारीपर्यंत इराण-इराक मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी भारताकडून करीत होते; मात्र २६ फेब्रुवारीनंतर हा तणाव अधिक वाढला. त्यामुळे सोयाबीनची खरेदी तूर्त थांबली आहे. सोयाबीनचे भाव प्रती क्विटंल चारशे रुपयांनी गडगडले आहे. सोयाबीनला अधिक चांगले भाव मिळण्याची अपेक्षा असताना अचानकसोयाबीनचे भाव कोसळल्याने देशभरातील कास्तकारांना कोट्यवधींचा आर्थिक फटका सोसावा लागत आहे.फेब्रुवारी महिन्याच्या २० तारखेपर्यंत सोयाबीनला ३९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत होते. आगामी काही दिवसांत ४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची आस कास्तकारांना लागली होती. त्यामुळे अनेकांनी सोयाबीन बाजारात आणले नव्हते. ही परिस्थिती असताना अचानक सोयाबीनच्या भावात घसरण सुरू झाली. सोयाबीनचे भाव ३५०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन थांबल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. तब्बल चारशे रुपयांनी सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही सोयाबीनचा साठा आहे, त्या कास्तकारांनी आता मिळेल त्या भावात सोयाबीन काढण्यास सुरुवात केली आहे.‘एनसीडीईएक्स’कडे १३७७९४ टन साठानॅशनल कॉमोडिटी अ‍ॅण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेडकडे देशभरातील गोदामांमध्ये १३७७९४ साठा आहे. अकोला- ४९१५७, इंदूर- १९८७५, कोटा-१८१०८, लातूर -५३७, मंदसौर-११७१७, नागपूर-४०१, सागर २३३८, शुजालपूर-१४८०११, आणि विशादा २०८५० असा एकूण १३७७९४ टन साठा पडून आहे. सोयाबीनचे भाव वाढतील म्हणून हा साठा करण्यात आला होता; मात्र या साठ्यांमुळे आता कोट्यवधींचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे. 

भारत-पाकिस्तानमध्ये गत काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्यामुळे इराण-इराकने भारतातील सोयाबीनची खरेदी थांबविली. भारतात सोयाबीनला फारशी मागणी नाही. मार्चअखेर आर्थिक वर्ष असल्याने व्यापारी वर्ग सोयाबीन खरेदीच्या मन:स्थितीत नाही. परिणामी, सोयाबीनचे भाव पडले आहे.-वसंत बाछुका, उद्योजक अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार