जावयाचा सासऱ्यावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:00 IST2020-12-19T18:26:49+5:302020-12-19T19:00:54+5:30

Crime News मुलीला अचानक घरात येऊन मारहाण करणाऱ्या जावयास सासऱ्याने विनंती केली असता जावयाने सासऱ्यावर चाकूहल्ला केला.

Son in law stabs his father-in-law | जावयाचा सासऱ्यावर चाकूहल्ला

जावयाचा सासऱ्यावर चाकूहल्ला

शिर्ला: माहेरी आलेल्या मुलीला अचानक घरात येऊन मारहाण करणाऱ्या जावयास सासऱ्याने विनंती केली असता जावयाने सासऱ्यावर चाकूहल्ला केला. अर्धातास हा जीवघेणा थरार सुरू हाेता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सासऱ्यास उपचारार्थ अकोला सर्वोपचार रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. ही घटना पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिर्ला येथे 19  डिसेंबर राेजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.

शनिवारी दुपारी शिर्ला येथे जावाई संतोष गजानन ढाळे (वय २५ वर्षे) याने माहेरी आलेल्या बायकोला घरात जाऊन मारहाण सुरू केली. माहिती मिळताच सासरे सदाशिव वाडेकर ((वय ६५ ) घरी पोहचून मुलीला जावायने मारहाण थांबविण्याची विनंती केली. मात्र जावायाने चक्क सासरे सदाशिव वाडेकर यांच्या चाकु हल्ला चढवला. यावेळी परिस्थिती गंभीर हाेत असल्याचे पाहून एका नागरिकाने पोलीसांना माहिती देऊन रुग्णवाहिकाही बाेलाविली. जखमी सासऱ्यास पातुर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र गंभीर सासरे सदाशिव वाडेकर यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.

संतोष गजानन ढाळे याचे गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतु पत्नी माहेरी राहत असल्याने हा गंभीर घटनाक्रम झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. परस्पराविरुध्द फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पातुर पोलीस स्टेशनमध्ये सुरू हाेती.  

 

 दगडविटांचाही केला मारा

जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पळत सुटलेल्या सासऱ्यावर जावयाने दगडविटांचा माराही केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चाकु हल्ल्याचा थरार अर्धा तास सुरू होता. चाकु घेऊन फिरणाऱ्या जावयास पाहून परिसरातील नागरिकही भयभीत झाले हाेते.

Web Title: Son in law stabs his father-in-law