कौटुंबिक वादातून जावयानं केली सासूची हत्या, गुन्हा दाखल

By नितिन गव्हाळे | Updated: October 22, 2023 12:01 IST2023-10-22T12:00:43+5:302023-10-22T12:01:07+5:30

या प्रकरणात खदान पोलिसांनी जावयासह एका महिलेस ताब्यात घेतले आहे.

Son-in-law killed mother-in-law due to family dispute, case registered | कौटुंबिक वादातून जावयानं केली सासूची हत्या, गुन्हा दाखल

कौटुंबिक वादातून जावयानं केली सासूची हत्या, गुन्हा दाखल

अकोला : खदान पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हैदरपुरा भागात कौटुंबिक वादातून वादातून जावयाने धारदार शस्त्राने वार करून सासूची निर्घृण हत्या केल्याची घटना 21 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली घडली. या प्रकरणात खदान पोलिसांनी जावयासह एका महिलेस ताब्यात घेतले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून हैदर पुरा येथील जावाई जावेद व सासू शमशाद बी रफिक खान (४०) यांच्यात वाद सुरू होता या वादातून जावाई जावेद याने सासू शमशाद बी तिच्यावर शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास समोर आली. 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके व खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी पथकासह घटनास्थळावर धाव घेऊन आरोपी जावेद व त्याच्या पत्नीस ताब्यात घेतले आहे. हत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही पोलीस आरोपी व त्याच्या पत्नीची चौकशी करीत आहेत. या प्रकरणात खदान पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास खदानचे ठाणेदार धनंजय सायरे करीत आहेत.
 

Web Title: Son-in-law killed mother-in-law due to family dispute, case registered