मुलाच्या मारहाणीत वडिलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 11:46 IST2021-04-06T11:44:23+5:302021-04-06T11:46:20+5:30

Crime News : अर्जुन सहारे (५५) असे वडीलाचे नाव आहे, तर अनिल अर्जुन सहारे (२५)असे मुलाचे नाव आहे.

Son beaten father to death near Akola | मुलाच्या मारहाणीत वडिलाचा मृत्यू

मुलाच्या मारहाणीत वडिलाचा मृत्यू

ठळक मुद्दे रात्री दहा वाजताचे सुमारास किरकोळ कारणावरून भांडण झाले.अनिल सहारे याने वडिल अर्जुन सहारे यांना काठीने मारहाण केली.यामध्ये अर्जुन सहारे यांचा मृत्यू झाला.

डोंगरगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या तरुण मुलाने केलेल्या मारहाणीत वडीलांचा मृत्यू झाल्याची घटना बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव येथे साेमवारी रात्री घडली. अर्जुन सहारे (५५) असे वडीलाचे नाव आहे, तर अनिल अर्जुन सहारे (२५)असे मुलाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनूसार, मुलगा अनिल सहारे व वडील अर्जुन सहारे यांचे सोमवारी रात्री दहा वाजताचे सुमारास किरकोळ कारणावरून भांडण झाले. वाद वाढत गेला व दारुच्या नशेत असलेल्या अनिल सहारे याने वडिल अर्जुन सहारे यांना काठीने मारहाण केली. यामध्ये अर्जुन सहारे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविला. आरोपी मुलगा अनिल सहारे यालाही पोलिसांनी अटक केली असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: Son beaten father to death near Akola