शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

अकोला जिल्हय़ातील समस्या मार्गी लावू ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 3:04 AM

नागपूर येथील विधान भवनातील मंत्रीमंडळाच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील विकास कामांसह विविध प्रश्नाचा मंगळवारी आढावा घेतला. लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले प्रश्न सकारात्मक घेत त्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले. जिल्ह्यातील विविध समस्या मार्गी लावत विकास कामांसाठी भरघोस निधी दिला जाईल. अशी ग्वाही दिली

ठळक मुद्देनागपुरात घेतला आढावा  लोकप्रतिनिधीच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री सकारात्मकविकास कामांसाठी निधीची घोषणा 

- जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या खाटांची संख्या पाचशेच्यावर नेणार! - बाश्रीटाकळी येथे स्पिनिंग हब आणि टेक्सटाइल पार्क उभारण्याबाबत पडताळणी करावी- सिटी बसस्थानकासाठी आवश्यक असणार्‍या जागेचा प्रस्ताव स्वतंत्रपणे सादर करा- सांस्कृतिक भवनासाठी १५ कोटींचा निधी तातडीने देण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नागपूर येथील विधान भवनातील मंत्रीमंडळाच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील विकास कामांसह विविध प्रश्नाचा मंगळवारी आढावा घेतला. लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले प्रश्न सकारात्मक घेत त्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले. अकोला जिल्ह्यातील विविध समस्या मार्गी लावत विकास कामांसाठी भरघोस निधी दिला जाईल. अशी ग्वाही दिली.या बैठकीला पालकमंत्री डॉ.रणजित पाटील, खा.संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ.बळीराम सिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जि.प.चे.सीईओ एस.रामामुर्ति, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर उपस्थित होते.

जिल्ह्यासाठी २२0 हजार घरांचा प्रस्ताव तयार करावा!शबरी, रमाई आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांसाठी प्रतीक्षा यादी असते. यात उद्दिष्टही देण्यात येते; मात्र यावर्षीपासून घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात येणार नसून, नोंदणीनुसार उद्दिष्ट ठरविण्यात येणार आहे. घरकुलांची मागणी लक्षात घेता जिल्ह्यासाठी २0 हजार घरांचा प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी यादी तयार करण्याचे काम पूर्ण करावे, त्यानंतर या यादीनुसार उद्दिष्ट ठरवावे, त्यानुसार काम करावे, यासाठी आवश्यक असणारी नोंदणी जानेवारीपर्यंंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. घरकुलांसाठी आवश्यक असणारी जागा गावापासून २00 मीटरपर्यंंत असावी, त्यासाठी शासनाकडून परवानगी दिली जाईल, तसेच ५00 चौरस फूट मोफत, २000 चौरस फुटांपर्यंंत शुल्क आकारून जमिनीचा ताबा देण्यात यावा.अशी सुचना मुख्यमंत्र्यांनी केली.

सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने करा!कवठा, काटीपाटी,  घुंगशी बॅरेज या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी आवश्यक असलेल्या मान्यता तातडीने देण्यात आल्या आहे. कवठा बॅरेजचे काम जूनपर्यंंत पूर्ण करून पाणीसाठा निर्माण करण्यासाठी नियोजन करावे, यासाठी लागणारा ९0 कोटींचा निधी देण्यात येईल. उमा बॅरेजला आलेल्या पाच अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांचे काम पूर्ण करून पाणीसाठा निर्माण होण्याच्या दृष्टीने काम करणे आवश्यक आहे. अकोला शहरासह मूर्तिजापूर, बाळापूर आदी शहरांना पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून प्रकल्पांची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी कार्य करावे, तसेच बाश्रीटाकळी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी आरक्षण तातडीने मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.

कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी जून २0१८ पर्यंंत मुदत विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रलंबित कृषी पंपांना वीज पुरवठा करता यावा, यासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडून तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यात सिंचन प्रकल्प पूर्ण होत असल्यामुळे कृषी पंपांना वीज जोडणीची मागणी वाढणार आहे. त्यामुळे यावर्षी असलेली मागणी जूनपर्यंंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

शिवणी विमानतळ राज्य शासनाच्या ताब्यात घेण्याचा प्रस्ताव एअर पोर्ट अँथॉरिटीमार्फत विमानतळाचा विकास करण्यापेक्षा शिवणी विमानतळ राज्य शासनाच्या ताब्यात घ्यावे, या विमानतळाची धावपट्टी लांबविल्यास कमी खर्चात विमानतळाचा विकास होईल. यासाठी आवश्यक असणारी जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. 

जिल्ह्यात ८00 किमीचे रस्तेमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत जिल्ह्यात ८00 किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. यापैकी १९५ किमीचे रस्ते याच वर्षात पूर्ण करण्यात येणार आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, यासाठी लागणारा निधी अँन्युटीच्या माध्यमातून उभा करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, बाळापूर तालुक्यातील रस्ते वीज निर्मिती केंद्रातील राखेपासून बनविण्याचे प्रयत्न करून पाहावेत, तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने येथील कामे प्राधान्याने करण्यात यावीत,अशी सूचना केली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkola cityअकोला शहरDr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटीलGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीया